डे-नाईट कसोटी सामने का होत नाहीत? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे कसोटी सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. असं असताना पिंक टेस्ट क्रिकेट अर्थात डे नाईट कसोटी सामने का भरवले जात नाहीत? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्यावर आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी उत्तर दिलं आहे.

डे-नाईट कसोटी सामने का होत नाहीत? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले...
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 5:13 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील सध्याच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. उर्वरित 10 कसोटी सामन्यापैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघ अंतिम फेरीत स्थान पक्कं करेल. बांगलादेशविरुद्ध 2 सामने, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने आहेत. पण या कसोटी मालिकेत एकही पिंक बॉल टेस्ट अर्थात डे-नाईट टेस्ट नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना हा फॉर्मेट बंद झाला की काय? असा प्रश्न पडला आहे. पिंक बॉल कसोटी सामन्याला 27 नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट राखून जिंकला होता. त्यानंतर पिंक बॉल टेस्टचं पर्व सुरु झालं. पण एका वर्षात दोन किंवा तीन कसोटी सामन्यांचं आयोजन होत असल्याचं दिसत आहे. 2023 या वर्षात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात एकमेव पिंक बॉल टेस्ट झाली. तसेच या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकमेव सामना झाला. हा सामना वेस्ट इंडिजने 8 धावांनी जिंकला.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी चर्चा करताना म्हणाले की, ‘तुम्ही पाच दिवसीय सामन्यासाठी तिकीट खरेदी करता. पण हा सामना दोन ते तीन दिवसात संपतो. काहीच रिफंड मिळत नाही. मी याबाबत थोडा भावुक आहे.’ भारतात तीन कसोटी सामने खेळले गेले. तिन्ही कसोटी सामने तीन दिवसापेक्षा जास्त काळ चालले नाहीत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेलेला सामना फक्त दोन दिवसात संपला. भारताने ऑस्ट्रेलियात एकमेव डे नाईट कसोटी सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघ फक्त 36 धावा करून ऑलआऊट झाला. 87 वर्षातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या होती.

भारतीय संघ आतापर्यंत चार पिंक बॉल कसोटी सामने खेळला आहे. पहिला कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध 2019 मध्ये खेळला गेला. ईडन गार्डनवर हा सामना झाला. हा सामना भारताने एक डाव आणि 46 धावांनी जिंकला. दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020 मध्ये खेळला गेला. ओव्हल मैदानात खेळलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून विजय मिळवला. तिसरा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. चौथा पिंक बॉल कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध 2022 मध्ये खेळला गेला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात खेळलेल्या या सामन्यात भारताने 238 धावांनी विजय मिळवला.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.