नो हँडशेक प्रकरणी विराट कोहलीला का शिक्षा झाली नाही? हेडसोबत असं वागण्याचं कारण काय?
आयपीएल 2026 स्पर्धेतील 67वा सामना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला. कारण या सामन्यात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद झाला. सामन्यानंतर विराट कोहलीने त्याच्याशी हातही मिळवला नाही. पण असं असूनही बीसीसीआयने विराट कोहलीवर कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy: आयपीएल 2026 स्पर्धेलाही वादाची किनार लाभली आहे. त्यातही विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड प्रकरण चांगलं गाजत आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये आयपीएल स्पर्धेच्या 67व्या सामन्यात वाद झाला. या सामन्यात विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडला काही बोलला होता आणि त्याला हेडनेही प्रत्युत्तर दिलं. पण इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. सामन्यानंतर विराट कोहलीच्या मनात कटुता असल्याचं दिसून आलं. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करण्याची प्रथा आहे. हा सामना जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबीचे खेळाडू रांगेत हस्तांदोलन करत होते. तेव्हा विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडसोबत हात मिळवला नाही आणि पुढे निघून गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण असं असूनही बीसीसीआयने विराट कोहलीवर कारवाई का केली नाही? इतकंच काय तर त्याला समजही दिली नाही. चला जाणून घेऊयात कारण..
विराट कोहलीच्या कृतीवर कारवाई का नाही?
विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडसोबत हातमिळवणी केली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे बीसीसीआयकडून कारवाईची अपेक्षा होती. पण विराट कोहलीने हात न मिळवून कोणताही नियम मोडलेला नाही. हँडशेक हे स्पिरिट ऑफ क्रिकेटमुळे केलं जात. पण हातमिळवणी केलीच पाहीजे असा काही नियम नाही. आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत भारतीय संघही पाकिस्तानसोबत हातमिळवणी करत नाही. तेव्हा आयसीसीने काहीच कारवाई केली नाही. तसंच बीसीसीआयही या प्रकरणी काहीच करू शकत नाही. कारण हातमिळवणी करणं हा काही नियम नाही.
हँडशेक न करण्याचं कारण काय?
विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद शिवांग कुमारच्या षटकात झाला. शिवांग कुमार चौथं षटक टाकण्यासा आला होता. तेव्हा वेंकटेश अय्यने त्याची धुलाई केली. या षटकाच्या शेवटच्या षटकात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्या शाब्दिक चकमक झाली. विराट कोहलीने त्याला काहीतरी बोलला. पण ट्रेव्हिस हेड हसत राहिला. त्यानंतर विराटने त्याला गोलंदाजी करण्यास सांगितलं. पण विराट कोहली त्यानंतर फक्त 15 धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने 19वं षटक ट्रेव्हिस हेडला सोपवलं. या षटकात त्याने रजत पाटीदारला बाद केलं. हा सामना हैदराबादने 55 जिंकला.