AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 4th T20I Live Streaming | टीम इंडियाला चौथ्या सामन्यात बरोबरीची संधी, कोण जिंकणार?

West Indies vs India 4th T20I Live Streaming | विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना हा निर्णायक असणार आहे. विंडिजला हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे.

WI vs IND 4th T20I Live Streaming | टीम इंडियाला चौथ्या सामन्यात बरोबरीची संधी, कोण जिंकणार?
| Updated on: Aug 11, 2023 | 11:24 PM
Share

फ्लोरिडा | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील चौथा सामना हा शनिवारी 12 ऑगस्ट रोजी फ्लोरिडा इथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील शेवटचे दोन्ही सामने हे फ्लोरिडातच पार पडणार आहेत. याआधीच्या 3 सामन्यांपैकी सलग 2 सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियावर विजय मिळवत 2-0 अशी आघाडी घेतली. तर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केलं. टीम इंडिया आता चौथ्या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत फ्लोरिडा इथे एकूण 6 टी 20 सामने खेळले आहेत.

टीम इंडियाने या 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्यात पराभव झाला आहे. तर एक मॅच टाय झाली. त्यामुळे टीम इंडिया शनिवारी फ्लोरिडात पाचवा सामना जिंकण्यासाठी खेळेल. या चौथ्या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना केव्हा?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना हा 12 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथ्या सामन्याचं आयोजन कोणत्या स्टेडियममध्ये?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथी टी 20 मॅच सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल इथे खेळवण्यात येईल.

वेस्ट इंडिया विरुद्ध टीम इंडिया चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल? (wi vs ind 4th t20i live streaming)

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना मोबाईलवर पाहता येईल का?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना जिओ सिनेमा एपद्वारे मोबाईलवर पाहता येईल.

टी 20 सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीम | रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.

विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले