AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांचा भाजपाबद्दल खळबळजनक दावा, थेट म्हटले, दोन..

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने विरोधकांवर जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर आता संजय राऊत यांनी उत्तर दिले. यासोबतच त्यांनी काही आरोपही केली.

संजय राऊत यांचा भाजपाबद्दल खळबळजनक दावा, थेट म्हटले, दोन..
Sanjay Raut
| Updated on: Apr 21, 2026 | 10:24 AM
Share

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने एकच खळबळ उडाली. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, विरोधकांपैकी कोणीही आरक्षणाच्या मुद्द्यावर माझ्सासोबत डिबेट करावी, मी तयार आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डिबेटसाठी तयार असल्याचे म्हटले. त्यांनी वेळ सांगावी, मी तिथे पोहोचते. ज्यावेळी हा विधेयक मांडला जात होता, त्यावेळी मी दिल्लीत होते, तिथे काय घडले हे आम्हाला माहिती आहे. आता शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस स्वत: वकील आहेत ना? मग त्यांनी एकदा नीट वाचावे.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, संसदेत असलेल्या लोकांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का? हे संसदेत बसलेल्या लोकांची अक्कल काढत आहेत. त्यामध्ये त्यांचेही खासदार आहेत. मुख्यमंत्री किती खोटं बोलणार आहेत. फडणवीसांनी त्यांची स्तर सांगावी, कोणती स्तर आहे. भाजपाची कोणती लेव्हल आहे ती सांगावी. कोणतेही विधेयक पाडण्यात आले नाही, ज्याचा संबंध महिला आरक्षणासंदर्भात आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला त्यांना प्रधानमंत्रिपदावरून मोदींना जाण्याचे वेद लागले आहेत, त्या गटाला. त्या गटात देवेंद्र फडणवीस आहेत का हे मला माहिती नाही. मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता आपल्याकडे राहावी, याकरिता हे बिल आणण्यात आलं.

हा फक्त आमचा आरोप नसून हे सत्य आहे. तुम्हाला महिलांना आरक्षण देण्यास कोणीही रोखल नाही. नरेंद्र मोदी यांनी मनात आणले असते तर हे विधेयक ते मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदी यांची इच्छा असती तर त्यांनी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी स्वत: चर्चा केली असती आणि मन वळवली असती, त्यापूर्वी त्यांनी ते केले. पण या बिलाचे सुत्रधार अमित शाह होते, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...