AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND | विंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाच्या दिनेश कार्तिक याची मोठी घोषणा!

Dinesh Karthik Team India | टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक निवृत्ती घेणार असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात आहे. आता दिनेश कार्तिकने मोठी घोषणा केली आहे.

WI vs IND | विंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाच्या दिनेश कार्तिक याची मोठी घोषणा!
| Updated on: Jul 01, 2023 | 8:48 PM
Share

मुंबई | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. टीम इंडिया लवकरच विंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज आणि 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेने वेस्ट इंडिज दौऱ्याची सांगता होणार आहे. बीसीसीआयने कसोटी आणि वनडे सीरिजसाठी 23 जूनला भारतीय संघ जाहीर केला आहे.  आता या दौऱ्याआधी टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटर दिनेश कार्तिक याने मोठं विधान केलं आहे.

दिनेश कार्तिक गेल्या अनेक महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे. कार्तिकने अखेरचा टी 20 सामना हा 2 नोव्हेबंर 2022 रोजी खेळला होता. तर कार्तिकला अखेरचा कसोटी आणि वनडे सामना खेळून 3 वर्षांपेक्षा अधिक वेळ झाली आहे. मात्र दिनेश कार्तिक आगामी विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. कार्तिकने याआधी मोठं विधान केलं आहे.

दिनेश कार्तिक काय म्हणाला?

दिनेश कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो. मी विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असणार आहे, असं कार्तिकने म्हटलंय. “मी तामिळनाडू्च्या निवड समितीला विजय हजारे ट्रॉफी निवडीसाठी उपलब्ध असेन, याची माहिती देणार आहे. मी या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सूक आहे.”, असं स्पोर्टस्टारने दिनेश कार्तिकच्या हवाल्याने म्हटलंय.

इतकंच नाही, तर दिनेश कार्तिक याला विजय हजारे ट्रॉफीसह सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही खेळायचंय. या दोन्ही स्पर्धेत खेळल्याने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी सराव होईल, असं कार्तिकने म्हटलं. “मला दोन्ही व्हाईट बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळायचंय. जेणेकरुन आयपीएलच्या दृष्टीकोनातून तयारी होईल”, असंही कार्तिकने स्पष्ट केलं.

दरम्यान आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं यंदा भारतात आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिक कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसू शकतो. दिनेश कार्तिकने नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलमध्ये कॉमेंट्री केली होती.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती