AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Tour Of West Indies | बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या वेस्टइंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

Bcci On Team India | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Team India Tour Of West Indies | बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या वेस्टइंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
चार खेळाडू बाहेर नेमके कशासाठी जात होते हे समोर आलं नाही. मात्र त्यांचे काही चुकीचं काम करतानाचे पुरावे मिळाले तर त्यांच्यावर बीसीसीआय मोठी कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही.
| Updated on: Jun 12, 2023 | 9:37 PM
Share

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाला जागितक कसोटी अजिंक्यपद महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 209 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली. कांगारुंनी भारतासमोर विजयासाठी 444 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताने सर्वबाद 234 धावा केल्या. टीम इंडियाचं अशा प्रकारे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी लांबली. दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडियाचा वेस्टइंडिज दौरा

टीम इंडिया या दौऱ्यात वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात 2 कसोटी,3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल स्टार खेळाडूंना टी 20 मालिकेत संधी!

विंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने तर सांगता ही टी 20 सीरिजने होणार आहे. एकूण 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत टीम इंडियात युवा खेळाडूंची पहिल्यांदाच निवड होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. नुकतंच आयपीएल 16 वा मोसम पार पडला. या 16 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंचा बीसीसीआय निवड समिती टी 20 मालिकेत समावेश करणार असल्याचं म्हटलं जातंय.

बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

यशस्वी आणि रिंकू सिंह दोघांचं नाव निश्चित!

विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आयपीएल गाजवलेल्या रिंकू सिंह आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचं नाव निश्चित समजलं जात आहे. रिंकूने 16 व्या मोसमात केकेआरकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावा केल्या.

तसेच राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळताना यशस्वीने आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा ठोकल्या. या दोघांनी आपल्या संघांना अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले. त्यामुळे बीसीसीआय निवड समितीने या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिला सामना – 12 ते 16 जुलै

दुसरा सामना – 20-24 जुलै

वनडे सीरिज

पहिला सामना – 27 जुलै

दुसरा सामना 29 जुलै

तिसरा सामना 1 ऑगस्ट

टी 20 सीरिज

पहिला सामना – 4 ऑगस्ट

दुसरा सामना – 6 ऑगस्ट

तिसरा सामना – 8 ऑगस्ट

चौथ्या सामना – 12 ऑगस्ट

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.