रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? मुंबईच्या निवड समितीने दिले असे अपडेट

रोहित शर्मा आणि विराट कोहली फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी बीसीसीआने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता या बातमीत ट्विस्ट आला आहे.

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? मुंबईच्या निवड समितीने दिले असे अपडेट
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? मुंबईच्या निवड समितीने दिले असे अपडेट
Image Credit source: Ayush Kumar/Getty Images
| Updated on: Nov 13, 2025 | 4:34 PM

वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची मोर्चेबांधणी सुरु आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला अजूनही दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी दोन्ही दिग्गज खेळाडू वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. पण या मालिकांचं प्रमाण मर्यादीत असल्याने निवड समितीला त्यांची निवड करताना विचार करावा लागत आहे. असं असताना बीसीसीआयने दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्याचे आदेश दिले आहेत. बीसीसीआयने स्पष्ट केलं की, जर त्यांना वनडे फॉर्मेटसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांनी देशांतर्गत स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे. त्यानंतर रोहित शर्माने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची तयारी दर्शवल्याचं वृत्त आलं. पण या बातमीत आता ट्विस्ट आला आहे. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलं की, रोहित शर्माकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

एमसीएचे मुख्य निवडकर्ते संजय पाटील यांनी सांगितलं की, रोहितने अद्याप कोणताही संपर्क साधलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार संजय पाटील म्हणाले की, “मला रोहित शर्माकडून अद्याप कोणताही संपर्क मिळालेला नाही. जर तो मुंबईकडून खेळला तर ते आमच्यासाठी चांगले असेल. ते तरुणांसाठीही चांगले असेल. बीसीसीआय, अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी खूप चांगले पाऊल उचलले आहे.” बीसीसीआयने रोहित आणि विराटला वनडे मालिकेपूर्वी फिट राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 24 डिसेंबर ते 11 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची भारत दक्षिण अफ्रिका वनडे मालिकेसाठी संघात निवड होईल यात काही शंका नाही. ही वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून तीन सामने असणार आहेत. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र या मालिकेत खेळणार की नाही हे देखील स्पष्ट नाही. दरम्यान, बीसीसीआय आणि सध्याचे संघ व्यवस्थापन त्यांच्या वाढत्या वयामुळे आणि अलिकडच्या खराब कामगिरीमुळे चिंतेत आहेत. पण रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वाधिक धावा करून निवड समितीला पुन्हा संभ्रमात टाकलं आहे.