IND vs ENG: पाचव्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी? कोणाचा पत्ता कापणार?

India Playing XI for 5th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना साउथॅम्प्टनमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं जाणार असण्याची शक्यता आहे. सॅमसनसह आणखी एका खेळाडूची संघात वर्णी लागू शकते.

IND vs ENG: पाचव्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी? कोणाचा पत्ता कापणार?
IND vs ENG: पाचव्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी? कोणाचा पत्ता कापणार?
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 11, 2026 | 4:44 PM

India vs England, 5th T20I: इंग्लंड दौऱ्यात टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा औपचारिक सामना साउथॅम्प्टन येथे होत आहे. ही मालिका इंग्लंडने आधीच 3-0 ने जिंकली आहे. त्यामुळे हा एक औपचारिक सामना असणार आहे. पण हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया पूर्ण जोर लावणार यात काही शंका नाही. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पाचव्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. संजू सॅमसन पहिल्या टी20 सामन्यात खेळला होता. त्यानंतर त्याची जागा तीन टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीने घेतली. पण तिन्ही सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे संजू सॅमसनला पाचव्या टी20 सामन्यात संधी मिळेल असं बोललं जात आहे. पण संजू सॅमसन कोणाची जागा घेणार? हा प्रश्न आहे. यासाठी वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा आणि इशान किशन यांची नाव आघाडीवर आहेत.

संजू सॅमसन कोणाची जागा घेणार?

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्याने तीन सामन्यात फलंदाजी केली. पण त्याला काही खास करता आलं नाही. त्यात दोन सामन्यात आयपीएल संघातील त्याचा सहकारी असलेल्या जोफ्रा आर्चरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे त्याची कमकुवत बाजू इंग्लंडच्या गोलंदाजांनी हेरली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वैभव सूर्यवंशीने तीन डावात 14च्या सरासरीने आणि 168 च्या स्ट्राईक रेटने फक्त 42 धावा केल्या आहेत.

इशान किशनची बॅटही इंग्लंड दौऱ्यात शांत असल्याचं दिसून आलं आहे. इशान किशन कमबॅक केल्यापासून प्लेइंग 11 चा भाग आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील चार सामन्यात इशान किशनला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण त्याने 16.50 सरासरीने आणि 115.78च्या स्ट्राईक रेटने फक्त 66 धावा केल्या आहेत. भारताचा उपकर्णधार तिलक वर्माची स्थितीही तशीच आहे. त्याने चार सामन्यात फक्त 51 धावा केल्या आहे. त्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये घ्यायचं तर कोणाला बसवणार हा प्रश्न आहे. आता संजू सॅमसन ओपनिंगच्या जागेसाठी रिप्लेस करतो की इशान-तिलकच्या जागेवर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संजू सॅमसनला संधी दिली तर आघाडीच्या डावखुऱ्या फलंदाजांमध्ये संजूच्या रुपाने उजवा फलंदाज येईल.

शिवम दुबेला आराम देणार?

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात अष्टपैलू शिवम दुबेला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्याची जागा सूर्यांश शेडगे घेण्याची शक्यता आहे. सूर्यांश शेडगे हा उजव्या हाताचा फलंदाज असल्याने त्याला संधी मिळू शकते.

Follow Us