IND U19 vs AUS U19: तीच तारीख..तोच संघ… वैभव सूर्यवंशी एका वर्षानंतर विक्रम रचण्याच्या तयारीत
वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मागच्या काही वर्षात त्याने एक एक करत अनेकांना विक्रमांना गवसणी घातली आहे. आता पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी नवा विक्रम रचण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. हा विक्रम 1 ऑक्टोबरला रचणार का? याकडे लक्ष लागून आहे.

भारतीय अंडर 19 संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत वनडे मालिका जिंकली. आता टेस्ट मालिका भारतीय संघ खेळत आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. वैभव सूर्यवंशीसोबत एक योगही जुळून आला आहे. एका वर्षांचं एक वर्तुळ 1 ऑक्टोबरला पूर्ण होणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2025 हा कालावधी पूर्ण होणार आहे. वैभव सूर्यवंशी गेल्या वर्षी याच तारखेला चेन्नईमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात चमकला होता. तेव्हा त्याने फक्त 58 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि चार षटकार होते. या खेळीत त्याने एकूण 18 चौकार आणि षटकारासह धमाकेदार शतक ठोकले होते. हा दिवस वैभव सूर्यवंशीसाठी खास होता. कारण त्याने अंडर 19 कसोटी संघात पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ही कामगिरी केली होतीय. आता वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलियात आहे. ब्रिस्बेनमध्ये तशीच कामगिरी करणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
वैभव सूर्यवंशीने 1 ऑक्टोबर 2024 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध संपूर्ण डावात 62 चेंडूंचा सामना केला होता. तसेच 104 धावा केल्या होत्या. या खेळीनंतर त्याच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित झाला होता. आंतरराष्ट्रीय युथ कसोटी क्रिकेट सामन्यात शतक ठोकणारा जगातील सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला होता. आता बरोबर एक वर्षांनी तसाच योग जुळून आला आहे. समोर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. तारीखही तीच आहे. पण आता त्याला हा विक्रम भारतात नाही तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर करायचा आहे. त्यामुळे त्याची खेळी विशेष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत अंडर 19 संघात 30 सप्टेंबरपासून कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने सर्व गडी गमवून 243 धावा केल्या. आता भारताचा डाव दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. भारताकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी काय कामगिरी करतो? पुन्हा आक्रमक खेळी करून शतक ठोकणार का? याकडे लक्ष लागून आहे.
