AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

के. एल. राहुलच्या आयपीएलमधील संघाने घेतला मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद!

भारतीय संघाचा खेळाडू के. एल. राहुलच्या लखनऊ संघाने महिला संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

के. एल. राहुलच्या आयपीएलमधील संघाने घेतला मोठा निर्णय, 'या' खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 22, 2023 | 6:27 PM
Share

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिला सामना 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. आताच वुमन्स आयपीएलचा लिलाव पार पडला असून 4 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. सर्व संघांनी आपल्या कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आपल्या संघाचं कर्णधारपद लिलावातील सर्वात महागडी ठरलेल्या स्मृती मंधानाकडे सोपवलं आहे. अशातच भारतीय संघाचा खेळाडू के. एल. राहुलच्या लखनऊ संघानेही महिला संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

यूपी वॉरिअर्स संघाने ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिसा हिलीकडे नेतृत्त्वपदाची धुरा सोपवली आहे. एलिसा हिली यष्टीरक्षक असून फलंदाजी करते. महिला क्रिकेटमधील एलिसा हिली सर्वात लोकप्रिय चेहरा असून अनुभवाचीही तिच्याकडे काही कमी नाही. मी पहिल्यांदा होणाऱ्या वुमन्स आयपीएल लीग स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली याचा मला अभिमान आहे. आमचा संघ संतुलित असून ही स्पर्धा जिंकण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न करू, असं एलिसा हिलीने सांगितलं आहे.

यूपी वॉरिअर्सने एलिसाला 70 लाखांमध्ये लिलावात आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूपी वॉरिअर्सने दीप्ती शर्मासाठी 2.6 कोटी खर्च केले होते. त्यामुळे सर्वांना वाटत होतं की संघाचं कर्णधारपद दीप्तीकडे जाईल मात्र संघ व्यवस्थापनाने एलिसाकडे नेतृत्त्व दिलंय.

ऑस्ट्रेलियासाठी एलिसाने पाच T-20 विश्वचषक (2010, 2012, 2014, 2018 आणि 2020) आणि 1 विश्वचषक (2022) जिंकले आहेत.  139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 127.72 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने एकूण 2446 धावा केल्या आहेत. 94 एकदिवसीय सामने खेळले असून 2639 धावा केल्या आहेत. यामध्ये तिने 5 शतके आणि 15 अर्धशतके मारली आहेत.

एलिसा हिली (C), सोफिया एसेल्टन, दीप्ती शर्मा, ताहिला मगरा, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, प्रश्वी चोप्रा, स्वेता सेहरावत, एस यशरी, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, लक्ष्मी यादव.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं