INDA vs BANA : टीम इंडिया बांगलादेशला फायनलमध्ये लोळवण्यासाठी सज्ज, सामना किती वाजता?

Womens Asia Cup Rising Stars 2026 India A vs Bangladesh A Final : वूमन्स टीम इंडियाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा धडक दिली आहे. महिला ब्रिगेड अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे.

INDA vs BANA : टीम इंडिया बांगलादेशला फायनलमध्ये लोळवण्यासाठी सज्ज, सामना किती वाजता?
Womens Asia Cup Rising Stars 2026 India A vs Bangladesh A Final
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Feb 22, 2026 | 1:29 AM

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यजमान टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत रविवारी 22 फेब्रुवारीला सुपर 8 मोहिमेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. सूर्यासेनेसमोर या सामन्यात उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीच्या हिशोबाने टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेसह इतर 6 संघांसाठी सुपर 8 मधील प्रत्येक सामना फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या फेरीत चाहत्यांना पैसावसूल मॅच पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. क्रिकेट चाहत्यांना इतर संघांसह टीम इंडियाच्या सुपर 8 मधील सामन्याचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स इंडिया ए टीम राधा यादव हीच्या नेतृत्वात आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेश वूमन्स ए टीम विरुद्ध भिडणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना कधी?

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना रविवारी 22 फेब्रुवारीला होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 12 वाजता टॉस होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए अंतिम सामना मोबाईलवर सोनी लिव्हएपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

भारत आणि बांगलादेशने असा मिळवला उपांत्य फेरीत प्रवेश

दरम्यान इंडियाने उपांत्य फेरीत श्रीलंका क्रिकेट टीमला पराभूत करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. तर बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे आता भारत आणि बांगलादेशपैकी कोण आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.