IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए ची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूकडे कॅप्टन्सी

India Tour Of Australia A Womens Schedule: क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याासाठी टीम इंडिया ए संघांची घोषणा केली आहे.

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए ची घोषणा, या युवा खेळाडूकडे कॅप्टन्सी
Image Credit source: bcci
| Updated on: Jul 15, 2024 | 12:24 AM

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए वूमन्स टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मीनू मणी टीम इंडिया ए चं नेतृत्व करणार आहे.तर श्वेत सहरावत ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकूण 7 सामने खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 मालिका खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार 3 टी20i, 3 वनडे आणि 1 सामना हा 4 दिवसांचा असणार आहे. या मल्टीसीरिज असलेल्या दौऱ्याची सुरुवात 7 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 22 ऑगस्टला या दौऱ्याची सांगता होणार आहे. बीसीसीआय वूमन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील टी 20 मालिकेतील सामने हे एलन बॉर्डर फिल्डमध्ये खेळण्यात येणार आहेत. तर 50 षटकांचे सामने हे मॅके येथे होतील. तर 4 दिवसांचा सामना हा गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मीनू मणी हीने टीम इंडियाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 टी 20 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. तसेच मीमूने 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मीनू डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व केलंय. तसेच बीसीसीआय महिला निवड समितीने डब्ल्यूपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये किरण नवगिरे, प्रिया पूनिया, शुभा सतिश, सजना संजीन साईका इशाक आणि मेघना सिंह यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी 20 मालिका

पहिला सामना, बुधवार, 7 ऑगस्ट

दुसरा सामना, शुक्रवार, 9 ऑगस्ट

तिसरा सामना, रविवार, 11 ऑगस्ट

वनडे सीरिज

पहिला सामना, बुधवार, 14 ऑगस्ट

दुसरा सामना, शुक्रवार, 16 ऑगस्ट

तिसरा सामना, रविवार, 18 ऑगस्ट

4 दिवसीय एकमेव सामना, 22 ते 25 ऑगस्ट

टीम इंडिया एचा ऑस्ट्रेलिया दौरा

वूमन्स टीम इंडिया ए : मिन्नू मणी (कॅप्टन), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, किरण नवगिरे, सजना सजीवन, उमा चेत्री (विकेटकीपर), शिप्रा गिरी (विकेटकीपर), राघवी बिश्त, सायका इशाक, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, सायली सातघरे, शबनम शकील (फिटनेस टेस्ट) आणि एस यशश्री.