AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19: प्लेट फोडल्या, शिव्या दिल्या… संपूर्ण सिझन गोंधळ घातला तरीही फरहानाला का मिळाली नाही ट्रॉफी?

Bigg Boss 19: फरहाना भट्टने संपूर्ण सिझनमध्ये गोंधळ घातला होता. तिने जवळपास घरातील प्रत्येक स्पर्धकाशी भांडली होती. ती चांगला खेळ खेळली. तरीही बिग बॉसची ट्रॉफी गौरव खन्ना कसा जिंकला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Bigg Boss 19: प्लेट फोडल्या, शिव्या दिल्या... संपूर्ण सिझन गोंधळ घातला तरीही फरहानाला का मिळाली नाही ट्रॉफी?
Farhana BhattImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 08, 2025 | 8:39 AM
Share

बिग बॉस सीझन 19 चा ग्रँड फिनाले काल पार पडला. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नाने बिग बिग बॉस 19चा ताज स्वत:च्या नावे केला. तर सेकंड रनरअप ठरली फरहान भट्ट. फरहाना घरात आल्यापासूनच तिने गोंधळ घातला होता. ती टॉप 2मध्ये पोहोचली होती. तरही बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकली नाही. नेमकं कारण तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

संपूर्ण सिझनमध्ये जर कोणी बिग बॉसचे घर हादरवून सोडला असेल, तर ती होती फरहाना भट्ट. तिच्याकडून जेवणाची प्लेट हिसकावली गेली, फरहानाने स्वतः प्लेट तोडलीही, तिचा राग, कोणाला चांगले-वाईट बोलणे, बेधक प्रतिक्रिया, भांडणात उडी मारण्याचा प्रकार आणि प्रत्येक मुद्द्यावर आपली मत ठामपणे मांडण्याची सवय यामुळे ती सीझनची सर्वात वादग्रस्त स्पर्धक ठरली. पण हेच हाय-व्होल्टेज व्यक्तिमत्त्व शेवटी तिच्यावर भारी पडले आणि ती बिग बॉस 19 च्या ट्रॉफीपासून हुकली.

सततच्या गोंधळाने प्रतिमेला कमकुवत केले

फरहानाची सर्वात मोठी ताकद- तिचा आक्रमक आणि दमदार वागणे होते, शेवटी हेच तिची सर्वात मोठी कमजोरी ठरले. चाहत्यांना सुरुवातीला तिचा ‘निर्भय’ स्वभाव आवडला, पण सीझन पुढे जाण्याबरोबरच हीच वृत्ती जास्तच दिसू लागली. प्रत्येक भांडणात सामील होणे, भांडण लांब लांब ओढणे आणि इतरांना भडकावणे यामुळे तिची नकारात्मक प्रतिमा तयार होत गेली.

घरच्या लोकांशी नातेसंबंध बिघडत गेले

रिअॅलिटी शोमध्ये नातेसंबंध हेही गेमचा भाग असतात. पण फरहानाने आपल्या फटकण बोलण्याने आणि वर्चस्व गाजवणाऱ्या वृत्तीमुळे घरच्या लोकांशी कधीही जवळचे नाते तयार केले नाही. अनेकदा घरातील स्पर्धकही म्हणत होते की, फरहाना खूप प्रतिक्रियाशील आहे, तिना कोणताही मुद्दा वाढवण्याची सवय आहे आणि ती कोणाचेही ऐकण्याऐवजी त्यांच्याशी भांडत बसते. या गोष्टी थेट प्रेक्षकांच्या मतांवर परिणाम करतात.

प्रेक्षकांना जोडू शकली नाही- संबंधितता कमी होती

फरहानाचे व्यक्तिमत्त्व दमदार नक्कीच होते, पण प्रेक्षकांना जोडले जाणारे नव्हते. मतदानात सर्वाधिक फायदा अशा स्पर्धकांना मिळतो ज्यांना प्रेक्षक स्वतःला जोडू शकतात. पण फरहानाची प्रतिमा “फटकळ, रागीट, नेहमी भांडणासाठी तयार” अशी बनली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिला मते मिळाली नाहीत.

दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.