AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s World Cup IND vs ENG : नाणेफेक इंग्लंडच्या बाजूने, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली…

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 20वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं होणार आहे.

Women's World Cup IND vs ENG : नाणेफेक इंग्लंडच्या बाजूने, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली...
Women's World Cup IND vs ENG : नाणेफेक इंग्लंडच्या बाजूने, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली...Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Oct 19, 2025 | 2:42 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या स्पर्धेत इंग्लंडने एकही सामना गमावलेला नाही. तर भारताने सलग दोन पराभव पाहीले आहेत. त्यामुळे भारताची धाकधूक वाढली आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर उपांत्य फेरीचं सर्वच गणित जर तर वर येऊन ठेपणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर भारताला उपांत्य फेरीचं गणित सोडवणं सोपं जाईल. त्यामुळे या सामन्यात भारतासाठी करो या मरोची स्थिती आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नॅट सायव्हर-ब्रंट म्हणाली की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्हाला बहुतेक नवीन खेळपट्टी हवी आहे. आमच्या संघात एक्लेस्टोन आणि बेल परत आले आहेत. ते खेळण्यासाठी सज्ज आहेत. आज आम्ही काही मोठ्या भागीदारी शोधत आहोत. भारतीय चाहत्यांमध्ये आम्हाला खूप गोंधळ पाहायला मिळाला आहे आणि आशा आहे की सर्वजण तयार असतील. आम्हाला माहित आहे की आमचे तीन कठीण सामने बाकी आहेत आणि आशा आहे की आम्ही आज जिंकू शकू.’

हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो आणि ते मिळाल्याने आम्हाला आनंद झाला. जेमी आज खेळत नाही आणि तिच्या जागी रेणुका खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध तिचा रेकॉर्ड चांगला आहे आणि म्हणूनच आम्ही तिला पुन्हा संघात आणू इच्छित होतो. जरी आम्ही हरलो असलो तरी आम्ही खरोखर चांगले क्रिकेट खेळलो आणि ही गोष्ट आम्हाला आत्मविश्वास देईल.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी जोन्स (विकेटकीपर), टॅमी ब्यूमोंट, हीदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकली, एम्मा लॅम्ब, एलिस कॅप्सी, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.