
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 17व्या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने उभे ठाकले आहेत. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या तान्झिद हसन आणि लिटनदास यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विकेटसाठी चांगलंच झुंजवलं. कुलदीप यादव याने पहिला ब्रेक मिळवून दिला आणि टीम इंडिया ट्रॅकवर आली. रवींद्र जडेजा याने नजमुल शांतो याला तंबूत पाठवून सामन्यावर पकड मिळवली. पण हार्दिक पांड्या जखमी झाल्याने एक गोलंदाज शॉर्ट दिसून येत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा याच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे महागडे ठरलेल्या सिराजला पुन्हा चेंडू सोपवण्याशिवाय पर्याय नव्हता.
मोहम्मद सिराज याची पहिली चार षटकं खूप महाग पडली. 4 षटका 24 धावा देत एकही गडी बाद केला नाही. पण हार्दिक पांड्या जखमी झाल्याने रोहित शर्माकडे पर्यायही उरला नव्हता. 23 वं षटक मोहम्मद सिराजकडे सोपवलं पण त्यातही काही खास करू शकला नाही. 4 धावा देत स्कोअर कमी करण्यात यशस्वी ठरला. सिराजची विकेटसाठी धडपड पुढच्या षटकात केएल राहुलने पूर्ण केली.
Appreciation Tweet for KL Rahul. 👏
What a great catch. 🙌
Don't miss the running celebration from Captain Rohit Sharma in the end 🔥 #INDvsBAN pic.twitter.com/it3mKoPUDL
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) October 19, 2023
25 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लेग साईडला उडी घेत अप्रतिम झेल घेतला. यामुळे मोहम्मद सिराजसह टीम इंडियाला दिलासा मिळाला. इतका कठीण झेल घेतल्याने सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. केएल राहुलने मागच्या काही महिन्यात विकेटकीपिंगवर घेतलेली मेहनत यातून अधोरेखित होत आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.