AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK WC 2023 : वर्ल्ड कपमधील भारत-पाक सामन्याची तारीख बदली, ‘या’ तारखेला होणार महामुकाबला!

World Cup 2023 मधील भारत-पाक हाय व्होल्टेज सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शेड्यूलमध्ये दिलेल्या तारखेनुसार हा सामना ज्या दिवशी होणार होता. त्याआधीच एक दिवस सामन्याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

IND vs PAK WC 2023 : वर्ल्ड कपमधील भारत-पाक सामन्याची तारीख बदली, 'या' तारखेला होणार महामुकाबला!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 02, 2023 | 5:51 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला काही दिवस राहिले असून हा थरार 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड कपचं शेड्यूल आलं असून आता सर्व टीम संघबांधणीची तयारी करताना दिसत आहेत. (IND vs PAK WC 2023)  मात्र अशातच भारत-पाक हाय व्होल्टेज (INDvs PAK Match) सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शेड्यूलमध्ये दिलेल्या तारखेनुसार हा सामना ज्या दिवशी होणार होता. त्याआधीच एक दिवस सामन्याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कधी आणि कुठे होणार सामना-

अहमदाबादधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून शेड्यूलमध्ये 15 ऑक्टोबरला हा सामना पार पडणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र यामध्ये आता बदल झाला असून एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑक्टोबरला हाय व्होल्टेज सामना होणार असल्याची माहिती समजत आहे.

सामन्याची तारीख का बदलली?

15 ऑक्टोबरला नवरात्र उत्सव सुरू होत असून त्या दिवशी पहिला दिवस येत असल्याने हा सामना एक दिवस अगोदर खेळवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. सुरक्षिततेचं कारणही समोर आलं आहे. 15 च्या ऐवजी ही तारीख 14 ऑक्टोबर झाली असून  नरेंद्र मोदी स्टेडिअममध्येच हा सामना पार पडला जाणार आहे. मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती किंवा घोषणी आयसीसीकडून करण्यात आलेली नाही.

वर्ल्ड कप आधी टीम इंडिया आणि पाकिस्तान संघ आशिया कपमध्ये एकमेकांसमोर आमने-सामने येणार आहेत. यंदाच्या आशिया कपचं यजमानपद हे पाकिस्तान संघाकडे आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये टीम इंडिया जाणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर काही टीम इंडियाचे सामने हे पाकिस्तानबाहेर खेळवण्यात येणार असून इतर सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

Follow Us
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..