AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सर्वांना तो बॅटर फोडत होता, Arjun Tendulkar ने एका झटक्यात आटोपला त्याचा कार्यक्रम

Arjun Tendulkar Wicket : ओपनिंगला उतरल्यापासून या फलंदाजाने सर्वांना फोडण्यास सुरूवात केलेली. मात्र अर्जुन तेंडुलकर याने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत संघाला यश मिळवून दिलं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Video : सर्वांना तो बॅटर फोडत होता, Arjun Tendulkar ने एका झटक्यात आटोपला त्याचा कार्यक्रम
| Updated on: Aug 02, 2023 | 12:04 PM
Share

मुंबई :  भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने देवधर ट्रॉफीमध्ये कमाल करून दाखवली आहे. साऊथ झोनकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने सेंट्रल झोनविरूद्धच्या सामन्यात कडक शानदार गोलंदाजी केली. ज्या फलंदाजाने एकाही बॉलरला सोडलं नव्हतं, ओपनिंगला उतरल्यापासून या फलंदाजाने सर्वांना फोडण्यास सुरूवात केलेली. मात्र अर्जुन तेंडुलकर याने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत संघाला यश मिळवून दिलं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सेंट्रल झोन संघाने 261 धावा केल्या होत्या, यामधील यश दुबे याने सर्वाधिक 77 धावा आणि शिवम मावीने 38 धावा केल्या होत्या. संघाच्या विकेट पडत होत्या मात्र यश दुबेने एक बाजू लावून धरली होती. एकटा मैदानात पाय रोवून उभा राहिला होता मात्र त्याला अर्जुन तेंडुलकर याने माघारी पाठवलं. यशने मारलेला चेंडू फिल्डिंग करत असलेल्या साई सुदर्शच्या हातात विसावला. त्यानंतर शिवम मावीनेगही चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. 38 धावांवर असताना त्यालाही अर्जुनने कॅच आऊट केलं. त्यासोबतच मोहित रेडकर याने 3 विकेट्स घेतल्या आणि साऊथ झोनला विजयासाठी

सेंट्रल झोनने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या साऊथ झोनची सुरूवात ठिकठाक झाली होती. साई सुदर्शन याची नाबाद 132 धावांची शतकी खेळी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 43  धावांच्या खेळीच्या जोरावर ७ विकेट्सने साऊथ झोन संघाने हा सामना जिंकला.

पाहा व्हिडीओ :-

दरम्यान, व्यंकटेश अय्यर सेंट्रल झोनचे नेतृत्व करत आहेत तर मयंक अग्रवाल साऊथ झोनचे नेतृत्व करत आहेत. सेंट्रल झोनकडून यश दुबेने सर्वाधिक धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यर 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आयपीएल स्टार रिंकू सिंगला 36 चेंडूत 26 धावाच करता आल्या.

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.