World Cup 2023 Points Table : पराभवासह बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! चमत्कार झाला तरच पुनरागमन
SA vs BAN, World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभूत करत गुणतालिकेत उलटफेर केला आहे. नेदरलँडने पराभूत केल्यानंतर फटका बसला होता. मात्र पुन्हा एकदा दक्षिण अफ्रिकेची गाडी ट्रॅकवर आली आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळतो. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पराभूत केलं आहे. यामुळे गुणतालिकेत दक्षिण अफ्रिकेला चांगलाच फायदा झाला आहे. नेदरलँडकडून पराभवाची धूळ चाखल्यानंतर पुन्हा एकदा दक्षिण अफ्रिकेने चांगलं कमबॅक केलं आहे. दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकत दुसरं स्थान गाठलं आहे. दोन्ही संघांचे समसमान गुण आहेत. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा संघ आघाडीवर आहे. गुणतालिकेत आठवडाभर भारताचं पहिलं स्थान अबाधित असणार आहे. कारण भारताने पाच पैकी पाच सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. पण नेट रनरेट तितकासा चांगला नाही.
गुणातलिकेत काय बदल झाला?
गुणतालिकेत भारत पाच पैकी पाच सामने जिंकत 10 गुण आणि +1.353 नेटरनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभूत करत दुसरं स्थान गाठलं आहे. पाच पैकी चार सामने जिंकत 8 गुणांसह +2.370 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ 8 गुण आणि +1.481 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया 4 गुण आणि -0.193 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे.
पाकिस्तानचा संघ 4 गुणांसह पाचव्या, अफगाणिस्तान 4 गुणांसह सहाव्या, नेदरलँड 2 गुणांसह सातव्या, श्रीलंका 2 गुणांसह आठव्या, इंग्लंड दोन गुणांसह नवव्या आणि बांगलादेश 2 गुणांसह सर्वात शेवटी आहे.
| संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
|---|---|---|---|---|---|
| भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
| दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
| ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
| न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
| पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
| अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
| श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
| नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
| बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
| इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध बांगलादेश
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 5 गडी गमवून 382 धावा केल्या आणि विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान बांगलादेशला काही गाठता आला नाही. बांगलादेशने सर्व गडी गमवून 233 धावा केल्या. तसेच बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पाच पैकी चार सामने गमवल्याने टॉप 4 मध्ये येणं कठीण आहे. चमत्कार होईल अशी शक्यताही कमीच आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
