AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND va AFG : Rohit Sharma याने कपिल देव यांचा 40 वर्षांचा मोडला रेकॉर्ड, हिट-मॅनच्या शिरपेचात मानाचा तुरा

Rohit Sharma break Kapil Dev Record : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अफगाणिस्तानविरूद्ध शतक करत कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला आहे. तब्बल 40 वर्षांनी रोहित शर्माने हा रेकॉर्ड मोडला असून सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकलं आहे.

IND va AFG : Rohit Sharma याने कपिल देव यांचा 40 वर्षांचा मोडला रेकॉर्ड, हिट-मॅनच्या शिरपेचात मानाचा तुरा
| Updated on: Oct 11, 2023 | 8:37 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कपमधील भारत आणि अफगाणिनस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याने दमदार शतक केलंय. अफगाणिस्तान संघाने दिलेल्या 273 धावांचा पाठलाग करताना रोहितने सुरूवातीपासूनच तोडफोड फलंदाजी करत वन डे मधील 31 शतक पूर्ण केलं आहे. रोहित शर्मा याने या शतकासह अनेक विक्रम मोडले असून यामध्ये हिट-मॅनने 40 वर्षांपूर्वीची कपिल देव यांचाही एक रेकॉर्ड मोडत आपल्या नावावर केला आहे.

40 वर्षांचा कोणता रेकॉर्ड मोडलाय?

रोहित शर्मा याने अवघ्या 63 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आहे. या विक्रमी शतकासह रोहित वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. रोहितने सर्वाधिक ७ शतके केली असून त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा ६ शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. यासह रोहितने माजी कर्णधार कपिल देव यांचा 40 वर्षांचा रेकॉर्डही ब्रेक केलाय.

कपिल देव यांनी 72 बॉलमध्ये झिम्बाब्बेविरूद्ध 1983 मध्ये शतक केलं होतं. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग याने 81 (2007) तर विराट कोहलीने 82  (2011) बॉलमध्ये शतक केलं होतं. कपिल देव यांचा रेकॉर्ड कोणीही मोडला नव्हता. आता रोहितने अवघ्या 63 बॉलमध्ये शतक करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 84 बॉलमध्ये 131 धावांची खेळी केली यामध्ये 16 चौकार 5 षटकार मारले.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (C), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (C), रहमानउल्ला गुरबाज (W), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.