AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sikandar Raza : सिकंदर रझा याने ठोकलं वनडे मधील सर्वात वेगवान शतक

आयपीएलमध्ये पंजाब संघाने त्याला अनेकवेळा बाकावर बसवलं होतं. ज्यावेळी त्याला संधी मिळेल तेव्हा त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र तरीसुद्धा त्याला बेंचवर बसवलं आणि आता झालेल्या लंका प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये तो अनसोल्ड ठरला होता. याच सिकंदरने त्याची ताकद दाखवून दिली आहे.

Sikandar Raza : सिकंदर रझा याने ठोकलं वनडे मधील सर्वात वेगवान शतक
| Updated on: Jun 20, 2023 | 11:13 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी टॉप 10 संघांसाठी पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत. या सुरू असलेल्या सामन्यांमध्ये झिम्बाब्बेचा खेळाडू सिकंदर रझा याने तुफानी खेळी केली आहे. नेदरलँड आणि झिम्बाब्बे यांच्यामधील पाचव्या सामन्यात सिकंदर रझाने अष्टपैलू खेळी केली. बॉलिंग करताना चार विकेट्स आणि त्यानंतर 102 धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या शतकासह त्याने  वनडेमध्ये सर्वात फास्ट शतक केलं आहे.

सिकंदर रझाने 54 चेंडूत आपल्या राष्ट्रीय संघासाठी सर्वात वेगवान शतक झळकवण्याचा विक्रम केला आहे. 315-6 धावा ठोकल्या होत्या.  यामध्ये विक्रमजीत सिंह 88 धावा, स्कॉट एडवर्ट्स 83 धावा, मैक्स ओ’डॉवने 59 धावांच्या मदतीने 300 धावांचा टप्पा पार केला होता. यामध्ये झिम्बाब्बेकडून सिकंदर रझा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.

नेदरलँडने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्बेची सुरूवात चांगली सुरूवात झाली होती. कर्णधार क्रेग एर्विन 50 धावा आणि जॉयलॉर्ड गम्बी 40 यांनी 80 धावांची सलामी दिली होती. त्यानंतर सीन विलियम्स 91 धावा आणि सिकंदर रझाने नाबाद 102 धावा या दोघांनी संघाला 41 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला.

सिकंदर रझाने आपल्या संघाकडून सर्वात वेगवान शतक झळकवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सिकंदर रझाने 54 चेंडूत 102 धावा केल्या, या खेळीमध्ये त्याने 6 चौकार आणि 8 षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 188.89 होता. या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी सिकंदर रझाला सामनावीराचा किताब देण्यात आला. अ गटात झिम्बाब्वेने सलग दुसरा विजय मिळवला आहे, तर नेदरलँड्सने पहिला सामना गमावला आहे.

दरम्यान,  आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणाऱ्या सिकंदरला संघाकडून जास्त संधी मिळाली नाही. त्यानंतर लंका प्रीमिअर लीगमध्येही त्याला कोणी बोली लावली नाही. मात्र आपल्या बॅटने त्याने सर्वांना उत्तरं दिली आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.