AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK, T20 World Cup : पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या करियरला लागला मोठा डाग, पाहा काय झालं?

IND vs PAK, T20 World Cup : भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात विराट कोहली अपयशी ठरला आहे. या अपयशामुळे विराट कोहलीच्या नावावर वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.

IND vs PAK, T20 World Cup : पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या करियरला लागला मोठा डाग, पाहा काय झालं?
| Updated on: Jun 10, 2024 | 12:15 AM
Share

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. भारताला 20 ओव्हरही खेळू न देता 119 वर गुंडाळलं. या सामन्याता किंग कोहलाही अपयशी ठरला. विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना अपेक्षा होत्या. मात्र अवघ्या चार धावा काढून तो आऊट झाला. मात्र याचा त्याला चांगलाच फटका बसला असून त्याच्या करियरला डाग लागला आहे.

विराट कोहलीच्या नावावर वाईट विक्रम

विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही ओलांडता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध 1 धाव करता आली होती. वर्ल्ड कपमध्ये कोहली पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात त्याला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. पाकिस्तानविरूद्ध नेहमी चमकदार कामगिरी करणारा विराट आज दुसऱ्यांदा लवकर आऊट झाला. 2012 मध्ये टी-20 मालिकेत कोहली नऊ धावांवर बाद झाला होता.

विराट कोहली याची वर्ल्ड कपमधील तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. 2024 मध्ये म्हणजेच या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात 1 धाव काढून आऊट झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 2 धावा तर आज पाकिस्तानविरूद्ध 4 धावांवर आऊट झाला. आजच्या सामन्यात लवकर बाद झाल्याने त्याची वर्ल्ड कपमधील तिसरी सर्वात कमी धावांची खेळी ठरली आहे.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.