AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये पोहचल्यावर टीम इंडियाला मिळाले सरप्राइज…

T20 world Champion Team India Arrives Delhi: आयटीसी मौर्या हॉटेलचे एग्जिक्यूटिव शेफ शिवनीत पहोजा यांनी सांगितले की, भारतीय संघासाठी खास केक बनवण्यात आला. हा केक संघाच्या जर्सीच्या रंगाचा आहे. त्याची हायलाइट टी-20 ट्रॉफी आहे. खऱ्या ट्रॅफीसारखी ती दिसत आहे.

वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये पोहचल्यावर टीम इंडियाला मिळाले सरप्राइज...
team india
| Updated on: Jul 05, 2024 | 7:03 AM
Share

भारतीय क्रिकेट टीम टी-20 वर्ल्ड कप जिंगल्यानंतर गुरुवारी बारबाडोसवरुन नवी दिल्लीत दाखल झाले. भारतीय संघाचे विमानतळावरच जल्लोषात स्वागत झाले. टीम इंडियाचे चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. भारतीय संघ दाखल होताच इंडिया, इंडिया घोषणा चाहत्यांनी दिल्या. संघातील खेळाडूंना एका विशेष बसने विमानतळावरुन आटीसी मौर्या होटल (ITC Maurya) मध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणीही भारतीय संघाच्या खेळाडूंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण संघाला या ठिकाणी सरप्राइज देण्यात आले.

हॉटेलमध्ये असा मेनू

आयटीसी मौर्या हॉटेलचे एग्जिक्यूटिव शेफ शिवनीत पहोजा यांनी सांगितले की, भारतीय संघासाठी खास केक बनवण्यात आला. हा केक संघाच्या जर्सीच्या रंगाचा आहे. त्याची हायलाइट टी-20 ट्रॉफी आहे. खऱ्या ट्रॅफीसारखी ती दिसत आहे. चॉकलेटचा वापर करुन ती बनवण्यात आली आहे. भारतीय संघ मोठा प्रवास करुन परत आला आहे. त्यामुळे संघासाठी खास नाश्ता तयात करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना आवडणारे पदार्थ या नास्त्यामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूची आवड लक्षात घेतली आहे. जसे छोले भटूरे…, मिलेट्सची अनेक डिश बनवली आहे.

पीएम मोदी यांची टीम इंडिया भेट घेणार

भारतीय टीम गुरुवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यासाठी भारतीय संघातील खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यानंतर भारतीय संघ मुंबईसाठी रवाना होणार आहे. मुंबईत नरिमन पॉइंट ते वानखेड़े स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून भारतीय संघातील खेळाडूंची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंत संध्याकाळी BCCI कडून 125 कोटी रुपयाचे परितोषिक टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात येणार आहे.

टीम इंडियाचा कार्यक्रम असा

  • 06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
  • 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
  • 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
  • 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
  • 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
  • दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
  • 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
  • 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
  • 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
  • 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
  • 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
  • 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.