WTC 2023 : महाअंतिम सामन्यासाठी एकाच टीममध्ये, तरीही विराट-रोहित एकत्र जाणार नाहीत! आजी माजी कर्णधारांमध्ये वाद?

आयपीएल 2023 स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना असणार आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच टीम इंडिया रवाना होणार आहे. पण रोहित आणि विराट वेगळे जातील, असंच चित्र आहे.

WTC 2023 : महाअंतिम सामन्यासाठी एकाच टीममध्ये, तरीही विराट-रोहित एकत्र जाणार नाहीत! आजी माजी कर्णधारांमध्ये वाद?
WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी विराट आणि रोहित वेगळे जाणार, कारण...Image Credit source: AP
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 5:15 PM

मुंबई : आयपीएल स्पर्धा 2023 संपल्यानंतर भारतीय खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होतील. अंतिम फेरीचा सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर असणार आहे. पण या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र इंग्लंडला जाणार नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया तीन टप्प्यात इंग्लंडला जाणार आहे. पहिली बॅच आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपवल्यावर 23 मे 2023 रोजी निघणार आहे. यामध्ये आयपीएलमध्ये ज्या संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे, असे खेळाडू असतील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दुसरी बॅच प्लेऑफची 23 मे आमि 24 मे रोजी असणारी प्लेऑफचे सामने संपल्यावर निघेल. अंतिम सामना 30 मे रोजी होणार आहे. त्यानंतर शेवटची बॅच इंग्लंडला रवाना होईल. त्यामुळे कोहली आणि रोहित शर्मा एकत्र जाण्याची शक्यता नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. पॉइंट टेबलचं गणित पाहता दोनपैकी एक टीम प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते. जर दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये एन्ट्री घेतली तर एलिमिनिटेरमध्ये सामना होईल. त्यामुळे एका संघाचा पराभव झाला की विराट किंवा रोहित आधीच इंग्लंडला रवाना होईल.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर कोणत्याही अडचणीमुळे सामन्यादरम्यान काही षटकांचा खेळ वाया जाऊ नये, याचीही खबरदारी आयसीसीने घेतली आहे. त्या अनुषगांने आयसीसीने 12 जून हा दिवस ठेवला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.