AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2024 Final | RCB साठी मंधाना नाही तर ‘ही’ खेळाडू हुकमी एक्का, दिल्लीसाठी ठरणार मोठा काटा

WPL Final 2024 RCB vs DC : वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा फायनल सामना आज होणार आहे. या सामन्यानध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दो संघ भिडणार आहेत. दोन्ही टीमच्या पुरूष संघालाही आतापर्यंत विजेतेपद जिंकता आलें नाही. आजच्या फायनलनंतर नवीन संघ चॅम्पियन होणार आहे.

WPL 2024 Final | RCB साठी मंधाना नाही तर 'ही' खेळाडू हुकमी एक्का, दिल्लीसाठी ठरणार मोठा काटा
| Updated on: Mar 17, 2024 | 4:59 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 चा फायनल आज होणार आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तर दुसरीकडे स्मृती मंधानाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पहिल्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. साखळी सामन्यांमध्ये दिल्लीची कामगिरी इतर संघांच्या तुलनेत सरस राहिली आहे. दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकून थेट अंतिम फेरी गाठली. आरसीबी संघाची हुकमी खेळाडू आजही चालली तर त्यांनी विजेतेपद उंचावण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोण आहे ती खेळाडू जाणून घ्या.

आरसीबीसाठी हुकमी एक्का कोण?

आरसीबी संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात अष्टपैलू एलिस पेरीचं मोलाचं योगदान राहीलं आहे. दुसऱ्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करत पेरी ऑरेंज कॅपची मानकरी आहे. पेरीने 8 सामन्यात 312 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर पेरीने 8 सामन्यात 7 विकेटही मिळवल्या आहेत. अष्टपैलू कामगिरीमुळे एलिस पेरी आरसीबीसाठी हुकमी खेळाडू राहिली आहे.

आरसीबीने यंदाच्या हंगामात सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकुन दमदार सुरुवात केली होती. पण नंतरच्या सामन्यात आरसीबीच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाला. मात्र शेटवच्या सामन्यात आरसीबाने मुंबई इंडियन्सचा पराभव करत बाद फेरी गाठली. त्यांनंतर अंतिम सामन्यात जाण्यासाठी आरसीबीसमोर पुन्हा एकदा मुंबईचं आव्हान होतं. या आव्हानाला स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीने हुशारीने तोंड दिलं आणि विजय मिळवत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं. यंदाच्या हंगामात साखळी फेरीत आरसीबीने 8 पैकी 4 सामने जिंकत बाद फेरी गाठली होती.

दिल्लीची सांघिक कामगिरी वरचढ ठरणार?

दिल्ली कॅपिटल संघाने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. दिल्ली संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरी उत्तम राहीली आहे. कर्णधार मेग लॅनिंगने 308 धावा करत सर्वाधिक धावा करणारी ती दुसरी खेळाडू आहे. तर शफाली वर्मा, एलिस कॅप्सी आणि जेमिमाह रॉड्रिग्जनेही चांगली कामगिरी केली आहे.

दरम्यान, खासकरून गोलंदाजीत दिल्लीच्या संघाने चांगली कामगिरी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दिल्लीची गोलंदाज जोस जोनासन 6 सामन्यात 11 विकेट, मारिझान काप 6 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. राधा यादवने 8 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स टीम | स्मृती मंधाना (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, दिशा कासट, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादूर, इंद्राणी रॉय, शुभा सतिश, इंद्रनीश मेघना, नादिन डी क्लर्क, केट क्रॉस आणि एकता बिश्त.

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ | मेग लॅनिंग (कॅप्टन), तानिया भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, मिन्नू मणी, अश्विनी कुमारी, अपर्णा मंडल, तितस साधू, स्नेहा दीप्ती , ॲनाबेल सदरलँड, लॉरा हॅरिस आणि पूनम यादव.

खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.