WPL 2024, GG vs MI : मुंबई इंडियन्सची गुजरातला पाजलं पराभवाचं पाणी, टॉप 3 मधील मुंबईचं स्थान पक्कं

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने टॉप 3 मधलं स्थान पक्कं केलं. हरमनप्रीत कौरच्या नाबाद 95 धावांची खेळी करत विजय मिळवून दिला.

WPL 2024, GG vs MI : मुंबई इंडियन्सची गुजरातला पाजलं पराभवाचं पाणी, टॉप 3 मधील मुंबईचं स्थान पक्कं
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 11:14 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये मुंबई इंडियन्सने धडक मारली आहे. करो या मरोच्या लढाईत गुजरात जायंट्सवर नामुष्की ओढावली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला होता. गुजरातने दिल्लीत चालत आलेल्या ट्रेंडप्रमाणे प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 20 षटकात 7 गडी गमवून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. दिल्लीच्या मैदानात हे आव्हान गाठणं कठीण असल्याने मुंबईची चांगलीच दमछाक झाली. पण हरमनप्रीत कौरच्या नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर हा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने 19.5 षटकात 3 गडी गमवून विजय मिळवला. गुजरात जायंट्सच्या पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता उर्वरित दोन संघासाठी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स यांच्यात चुरस आहे. त्यामुळे आता दोन जागांसाठी तीन संघांमध्ये चुरस असणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतल्या दुसऱ्या पर्वातील मुंबई इंडियन्स टॉप 3 मध्ये पात्र होणारी पहिली टीम आहे. आता मुंबई इंडियन्सला अव्वल स्थान कायम राखण्याचं आव्हान आहे. अव्वल स्थानी असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळतं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला बाद फेरीचा सामना खेळावा लागतो. कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “आमच्यासाठी हे खूप मोठं आव्हान होतं, आम्हाला जिंकायचे होते जेणेकरुन स्पर्धेत पुढे आमच्यावर दबाव येणार नाही. आम्हाला माहित होते की आमच्याकडे दीर्घ फलंदाजीची ऑर्डर आहे आणि आम्ही काम पूर्ण करू शकतो. थेट अंतिम फेरीत जाण्यासाठी निश्चितपणे पहिले स्थान मिळवण्यावर लक्ष असणार आहे.”

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील आतापर्यंत गाठलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबई इंडियने 1 चेंडू राखून 192 धावा केल्या. हरमनप्रीत कौरने 48 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 95 धावांची खेळी केली. तसेच यास्तिका भाटियाचीही बॅट आज चांगली तळपली. तिने 36 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 धावा केल्या. तसं पाहिलं तर हे खूपच खडतर आव्हान होतं. पण गुजरातच्या गोलंदाजांना हे आव्हान रोखणं कठीण झालं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर/कर्णधार), फोबी लिचफिल्ड, ॲशलेग गार्डनर, दयालन हेमलता, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम शकील.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.