WPL 2025 : अतितटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मिळवला विजय, युपी वॉरियर्सने गमवला हातातला सामना

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील सहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात रंगला. या सामन्यात युपी वॉरियर्सने 167 धावांचं आव्हान दिल्लीसमोर ठेवलं होतं. पण आव्हान गाठताना दिल्ली कॅपिटल्सचा चांगलाच घाम निघाला. शफाली वर्मा आणि मेग लेनिंग यांची चांगली सुरुवात केली. पण तरं सर्वच ढासळलं होतं.

WPL 2025 : अतितटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मिळवला विजय, युपी वॉरियर्सने गमवला हातातला सामना
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 19, 2025 | 10:57 PM

वुमन्स प्रीमियर लीगचा सहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात रंगला होता. हा सामन्यात तसं पाहिलं तर दिल्लीचं पारडं जड होतं. त्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्याने प्रथम गोलंदाजी आली. कारण दुसऱ्या डावात दव पडत असल्याने गोलंदाजी करणं कठीण जातं. युपी वॉरियर्सने हे गणित लक्षात घेऊनच सुरवातीपासून आक्रमक सुरुवात केली होती. किरण नवगिरेने चांगली सुरुवात केली. 27 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर मधल्या फळीत श्वेता सेहरावत आणि चिनले हेन्री यांनी चांगली फलंदाजी केली. श्वेताने 37, तर चिनेलेने नाबाद 33 धावांची खेळी केली. या तिघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर युपी वॉरियर्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या आणि विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दिल्लीने आक्रमक सुरुवात केली. शफाली वर्मा आणि मेग लेनिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावांची खेळी केली.पण त्यानंतर धावगती घसरली. पण अनाबेल सदरलँड आणि मॅरिझाने कॅप या जोडीने विजय खेचून आणला.

जेमिमा रॉड्रिग्स आली तशी परत गेली. तिने दोन चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाली. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. अनाबेल सदरलँड आणि मॅरिझाने कॅप ही जोडी मैदानात होती. केपने पहिल्या चेंडूवर 1 धाव घेऊन अनाबेलला स्ट्राईक दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सदरलँडने चौकार मारला. त्यामुळे विजय सोपा झाला. चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन मॅरिझाने कॅपला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूवर मॅरिझाने कॅपने एक धाव घेत विजय मिळवून दिला. त्यानंतर या जोडीने शेवटच्या काही षटकात कमाल केली. 48 धावांची भागीदारी केली आणि विजयश्री खेचून आणला. अनाबेलने नाबाद 41, तर मॅरिझाने कॅपने नाबाद 29 धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अ‍ॅनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), जेस जोनासेन, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी.

यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन) : किरण नवगिरे, वृंदा दिनेश, उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड.