WPL 2025 UPW vs DC : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून घेतला असा निर्णय, कर्णधार मेग लेनिंग म्हणाली..
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील आठवा सामना युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. युपी वॉरियर्स या स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीच्या दृष्टीने तयारी करत आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील आठवा सामना युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करून. तीच टीम घेऊन उतरणार आहोत . आम्हाला वाटते की आम्ही गेल्या सामन्यात सुधारणा केली आणि आज रात्रीही तेच करण्याचा विचार करत आहोत. खेळपट्टी आमच्या खेळाला अनुकूल असेल असे वाटते. विजयी बाजूने परत आल्याने आनंद झाला. आज रात्री पुन्हा चांगले खेळायचे आहे. ‘दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची चिंता स्पष्ट आहे की, दोन सामने गमवून सध्या गुणतालिकेत तळाशी आहेत. दिल्ली कॅपिटल्सने तीन सामन्यांपैकी दोन विजय मिळवले असले तरी त्यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केलेले नाही. मुंबई विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर कसा बसा विजय मिळाला. पुढील पाच सामन्यांपैकी चार बेंगळुरूमध्ये होणार असल्याने सलग तिसऱ्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात असतील.
युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्मा म्हणाली की, ‘आमचीही योजना गोलंदाजी करण्याची होती. आमच्या योजना सारख्याच राहतील. निकालांवर जास्त लक्ष केंद्रित करणार नाही, फक्त चांगले क्रिकेट खेळायचे आहे. राजा दींच्या जागी साईमा खेळत आहे. खेळपट्टी गवताळ आहे, वेगवान गोलंदाजांना मदत करेल.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, निकी प्रसाद.
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, वृंदा दिनेश, दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, उमा चेत्री (विकेटकीपर), क्रांती गौड, सायमा ठाकोर.
