AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs RCB Toss : बंगळुरुच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, कॅप्टन स्मृतीचा निर्णय काय?

Delhi Capitals Women vs Royal Challengers Bengaluru Women Toss : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. जाणून घ्या पहिली बॅटिंग कुणाची?

DC vs RCB Toss : बंगळुरुच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, कॅप्टन स्मृतीचा निर्णय काय?
wpl 2025 dc vs rcb toss smriti mandhana
| Updated on: Feb 17, 2025 | 7:42 PM
Share

वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. स्मृती मंधाना हीच्याकडे बंगळुरुच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर मेग लॅनिंगकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याचं आयोजन हे बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. बंगळरुने टॉस जिंकला. कॅप्टन स्मृतीने फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हीनेही टॉस जिंकून फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता, असं स्पष्ट केलं. दिल्लीने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केल्याची माहिती मेगने दिली. मारिजान कॅप आणि जेस जोनासेन या दोघांचं कमबॅक झालं आहे. तर निकी प्रसाद आणि अ‍ॅलिस कॅप्सी या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर बंगळुरुने एकमेव बदल केला आहे. एकता बिश्त हीचं कमबॅक झालं आहे.

सलग दुसरा सामना कोण जिंकणार?

दरम्यान दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा हा या हंगमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी सलामीचा सामना जिंकत अप्रतिम सुरुवात केली आहे. आता दोन्ही संघ आमनेसामने आहेत. त्यामुळे कोणती 1 टीम सलग दुसरा सामना जिंकणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे दिल्ली सलग दुसरा सामना जिंकते की स्मृतीची आरसीबी टीम तसं करण्याासून रोखण्यात यशस्वी होते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

बंगळुरुने टॉस जिंकला

दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मारिजाने कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कॅप्टन), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे आणि रेणुका ठाकूर सिंग.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.