WPL 2025 UPW vs MIW : यूपी विरुद्ध मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने, पलटण सलग दुसऱ्यांदा धुव्वा उडवणार?
UP Warriorz Women vs Mumbai Indians Women : मुंबईने यूपीचा 26 फेब्रुवारीला 8 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यानंतर आता दोन्ही संघ पु्न्हा एकदा आमनेसामने आहेत.

वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील 16 वा सामना आज गुरुवारी 6 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. मुंबईचा हा या हंगामातील सहावा तर यूपीचा सातवा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे.
दोन्ही संघांची कामगिरी
यूपीची आतापर्यंत या हंगामात 50-50 अशी कामगिरी राहिली आहे. यूपीने आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत, तर दुप्पट अर्थात 4 सामने गमावले आहेत. यूपी पॉइंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह सर्वात शेवटी अर्थात सहाव्या स्थानी आहे. तर मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईने या हंगामात 5 सामने खेळले आहेत. मुंबईने या 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबई 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये
दिल्ली कॅपिट्ल्सने 7 पैकी 5 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी चुरस आहे. मुंबईचे 5 आणि गुजरातचे 6 सामन्यानंतर समसमान 6 पॉइंट्स आहेत. त्यामुळे मुंबईला यूपीविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. या सामन्यात कोण जिंकत? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
यूपी वचपा काढणार?
दरम्यान मुंबई-यूपी दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. मुंबईने यूपीचा 26 फेब्रुवारीला पराभव केला होता. त्यामुळे यूपीकडे आता विजय मिळवून पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. आता यात कोण बाजी मारतं? हे काही तासांतच स्पष्ट होईल.
यूपी वॉरियर्स वूमन्स टीम : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेट्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहेर सुलताना, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड, ताहलिया, ताहलिया मॅकग्रा, अलाना किंग, सायमा ठाकोर, अंजली सरवाणी, आरुषी गोयल आणि पूनम खेमनार.
मुंबई इंडियन्स वूमन्स टीम : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, जिंतीमणी कलिता, शबनीम इस्माईल, सायका इशाक, पारुनिका सिसोदिया, कीर्तना बालकृष्णन, नदीन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, अमनदीप कौर आणि अक्षिता माहेश्वरी.
