AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPW vs MIW : यूपीसमोर मुंबईचं आव्हान, सामन्याला किती वाजता सुरुवात?

UP Warriorz Women vs Mumbai Indians Women Live Streaming : मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर यूपी वॉरियर्स 4 गुणांसह पाचव्या क्रमांकांवर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक असणार आहे.

UPW vs MIW : यूपीसमोर मुंबईचं आव्हान, सामन्याला किती वाजता सुरुवात?
UP Warriorz Women vs Mumbai Indians wpl 2025Image Credit source: Bcci/Wpl
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 06, 2025 | 6:24 PM
Share

वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील 16 व्या सामन्यात यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. मुंबईचा हा या हंगामातील सहावा तर यूपीचा सातवा सामना असणार आहे. हरमनप्रीत कौर मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर दीप्ती शर्मा हीच्याकडे यूपी वॉरियर्जचं नेतृत्व आहे. यूपीच्या तुलनेत मुंबईची स्थिती चांगली आहे. मुंबईने 3 सामने जिंकले आहेत. तर यूपीला 2 सामन्यातच विजयी होता आलं आहे. मात्र यूपीला गेल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर मुंबईलाही गेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात चांगली चढाओढ पाहायला मिळू शकते.

यूपी विरुद्ध मुंबई सामना केव्हा?

यूपी विरुद्ध मुंबई सामना गुरुवारी 6 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

यूपी विरुद्ध मुंबई सामना कुठे?

यूपी विरुद्ध मुंबई सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

यूपी विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

यूपी विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

यूपी विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

यूपी विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पााहायला मिळेल. तर लाईव्ह सामन्याचा थरार मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवरुन पाहायला मिळेल.

यूपी वॉरियर्स वूमन्स टीम : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेट्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहेर सुलताना, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड, ताहलिया, ताहलिया मॅकग्रा, अलाना किंग, सायमा ठाकोर, अंजली सरवाणी, आरुषी गोयल आणि पूनम खेमनार.

मुंबई इंडियन्स वूमन्स टीम : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, जिंतीमणी कलिता, शबनीम इस्माईल, सायका इशाक, पारुनिका सिसोदिया, कीर्तना बालकृष्णन, नदीन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, अमनदीप कौर आणि अक्षिता माहेश्वरी.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...