WPL 2026 : शनिवारी पहिल्या डबल हेडरचा थरार, मुंबईसमोर कुणाचं आव्हान?

Womens Premier League 2026 : वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील दुसऱ्याच दिवशी डबल हेडर अर्थात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. जाणून घ्या या सामन्यांत कुणासमोर कुणाचं आव्हान असणार.

WPL 2026 : शनिवारी पहिल्या डबल हेडरचा थरार, मुंबईसमोर कुणाचं आव्हान?
WPL Trophy
Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Jan 10, 2026 | 2:18 AM

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात आरसीबीने गतविजेता मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला. आरसीबीने यासह मोहिमेची विजयाने सुरुवात केली. तर मुंबई इंडियन्सची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली. त्यानंतर आता रविवारी 10 जानेवारीला या हंगामातील पहिल्यावहिल्या डबर हेडरचा थरार रंगणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमनेसामने असणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात मुंबईसमोर दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. हे दोन्ही सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येतील? त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स

डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिला सामना असणार आहे. एश्ले गार्डनर गुजरात जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. तर मेग लेनिंग हीच्याकडे यूपी वॉरियर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस होणार आहे. दोघांपैकी कोणता संघ या हंगामात विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दीप्ती शर्माच्या कामगिरीकडे लक्ष

या सामन्यात यूपी वॉरियर्स टीमला ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीच्याकडून बॅटिंग आणि बॉलिंगने कडक कामगिरी अपेक्षित असणार आहे. दीप्ती वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपासून सातत्याने धमाका करत आहे. दीप्ती टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. तसेच दीप्ती बॅटिंगमध्येही माहिर आहे. अशात दीप्तीवर दुहेरी जबाबदारी असणार आहे.

मुंबईसमोर दिल्लीचं आव्हान

तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात मुंबईसमोर दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. दिल्लीचा हा या मोसमातील पहिला तर मुंबईचा एकूण आणि सलग दुसरा सामना असणार आहे. मुंबईला शुक्रवारी 9 जानेवारीला आरसीबी विरुद्ध पराभूत व्हावं लागलेलं. त्यामुळे मुंबईसमोर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. तर दिल्ली विजयी सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात हा सामना रंगतदार होण्याची चिन्ह आहेतं.

जेमीमाह रॉड्रिग्स हीचा हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असणार आहे. तर हरमनप्रीत कौर मुंबईला विजयी करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता नाणेफेक होईल. हे दोन्ही सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तसेच मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओहॉटस्टारद्वारे लाईव्ह मॅच पाहता येईल.