AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL, WPL मध्ये करोडोंची बोली, पण खेळाडूंना प्रत्यक्षात किती रक्कम मिळते?

IPL, WPL मध्ये खेळाडूंवर करोडोंची बोली लागते. पण प्रत्यक्षात त्यांना किती रुपये मिळतात. त्यांच्यावर लागलेल्या बोलीमधून किती रुपये कापले जातात. जाणून घेऊया.

IPL, WPL मध्ये करोडोंची बोली, पण खेळाडूंना प्रत्यक्षात किती रक्कम मिळते?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 15, 2023 | 6:51 PM
Share

मुंबई :  महिला प्रीमियर लीगची ( WPL ) लवकरच सुरुवात होणार आहे. लिलावात ( WPL Auction ) महिला खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावण्यात आली. या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली ती स्मृती  मानधना. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. सर्वात महागड्या पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत 3 भारतीय खेळाडू आहेत. या यादीत एक ऑस्ट्रेलियन खेळाडूही आहे.

आयपीएलमध्येही करोडो रुपयांची बोली लावून खेळाडू खरेदी केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, या खेळाडूंना जेवढ्या पैशांत खरेदी केले जाते, तेवढे पैसे त्यांना मिळत नाहीत.

खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली जाते. पण त्यांच्या खात्यात किती रुपये जमा होतात हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. खेळाडूंवर बोली लावलेल्या किंमतीतून किती रुपये वजा केले जातात आणि त्यांना किती रुपये मिळतात.

आयपीएल किंवा इतर लीगमध्ये जेव्हा जेव्हा लिलावाची किंमत मिळते तेव्हा त्यातून टीडीएस कापला जातो. भारतीय खेळाडूंना देय रकमेच्या 10% वर TDS कापला जातो. यानंतर, तुम्हाला आयकराच्या नियमांनुसार कर देखील भरावा लागेल, जो तुमच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे. निव्वळ उत्पन्नानंतर, यामध्ये अधिक कर भरावा लागू शकतो, टीडीएसची गणना लिलावाच्या पैशाच्या आधारे केली जाते.

पूर्ण पैसे मिळतात का?

लिलाव ही आधारभूत किंमत असते, त्यानंतर कंपन्यांचे खेळाडूंसोबत वेगवेगळे करार असतात. यामध्ये सामन्यांची संख्या, किती सामने खेळायचे किंवा कोणत्या आधारावर पैसे मिळणार आदी माहिती लिहिली जाते. त्या आधारे खेळाडूंना कराव्यतिरिक्त पैसे मिळतात. मग त्या निव्वळ उत्पन्नाच्या आधारे आयकर भरावा लागतो.

परदेशी खेळाडूंसाठी काय नियम आहेत?

परदेशी खेळाडूंना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 20 % टीडीएस भरावा लागतो. विदेशी खेळाडूंना TDS व्यतिरिक्त कोणताही कर भरावा लागत नाही. त्यांना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावरच कर भरावा लागतो.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?