WTC Final India vs New Zealand live streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड, सामना कुठे आणि कधी? या ठिकाणी पाहा Live

WTC Final India vs New Zealand live streaming : इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.

WTC Final India vs New Zealand live streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड, सामना कुठे आणि कधी? या ठिकाणी पाहा Live
WTC Final
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 10:31 AM

मुंबई : आज करोडो क्रिकेट रसिकांची प्रतिक्षा संपणार आहे. रोमांच काय असतो, हे क्षणाक्षणाला अनुभवायला मिळणार आहे. कोरोना काळात नियमरुपी बांधलेल्या बेड्या तशाच ठेऊन टीम इंडियाला प्रोत्साहित करण्याची संधी समस्त भारतवासियांना मिळणार आहे. आजपासून पुढचे चार दिवस क्रिकेटच्या मैदानात जग्गजेतेपदाची ‘कसोटी’ (WTC Final 2021) खेळविली जाणार आहे. पावसाने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर सहाव्या दिवशीही टक्कर सुरुच राहिल. कारण महामुकाबला तसा तगडा आहे. साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जग्गजेतेपदाची गदा उंचावण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) दोघेही आसुसलेले आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता सुरुवात होईल. (WTC Final India vs New Zealand live streaming when and where to watch online free in marathi)

सामना कुठे होणार?

इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी जग्गजेतेपदाच्या सामन्याला  भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक तीन वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक अडीज वाजता सामन्याच्या नाणेफेकीला विराट आणि केन मैदानात जातील.

सामना Live कुठे पाहणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सुनील गावस्करांच्या साथीला माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची कॉमेन्ट्री तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

टीम इंडियाचे अंतिम 11 शिलेदार

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी….

(WTC Final India vs New Zealand live streaming when and where to watch online free in marathi)

हे ही वाचा :

WTC Final 2021 : बुमराहची सामन्याअगोदर बायको संजनाला मुलाखत, ‘तो’ प्रश्न विचारताच लाजेने चुर्रर्र झाला!

WTC Final Weather Update : आज किती ओव्हर्सचा खेळ होणार, पाऊस पडणार का, हवामान कसं असणार? वाचा हा रिपोर्ट

WTC Final: पितृशोक असतानाही सिराजने ऐतिहासिक विजय मिळवून दिला, विराटने WTC फायनल बाहेर बसवलं!

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.