Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याचा इतक्या महिन्यांनी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश

WTC Final 2023 Ajinkya Rahane | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने अजिंक्य रहाणे याला मोठं गिफ्ट दिलं आहे. आता रहाणे टीम इंडियाला रिटर्न गिफ्ट देणार का?

Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याचा इतक्या महिन्यांनी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश
Image Credit source: AP
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 4:30 PM

लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महाअंतिम सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने टस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून इशान किशन आणि केएस भरत या दोघांपैकी केएसला संधी दिली. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आरपारच्या साम्यातून अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. अजिंक्य रहाणे याची रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अजिंक्य रहाणे याने टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये जवळपास 1 वर्ष 5 महिन्यांनी कमबॅक केलं आहे. अजिंक्य अखेरचा कसोटी सामना हा जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता रहाणे खेळतोय. रोहितने अजिंक्यवर विश्वास दाखवत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. टीम इंडियाने रहाणेचा 6 जून रोजी 35 वा वाढदिवस साजरा केला. आता रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्याने त्याला बर्थडे गिफ्ट मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

रहाणे रिटर्न गिफ्ट देणार?

रहाणेचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड अफलातून आहे. टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात एकही कसोटी सामना गमावलेला नाही. इतकंच नाही, तर रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलंय तेव्हा तेव्हा टीम इंडियाचा विजय झालाय किंवा सामना अनिर्णित राहिलाय. त्यामुळे रहाणेचं शतक हे टीम इंडियासाठी शुभसंकेत असतात. रहाणेची भारतापेक्षा परदेशात धावा करण्याची सरासरी अफलातून आहे. त्यामुळे रहाणे शतक ठोकत टीम इंडियाला रिटर्न गिफ्ट देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.