AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं? ‘हा’ मॅचविनर खेळाडू बाहेर!

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जून महिन्यामध्ये 7 ते 11 यादरम्यान फायनल सामना होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

WTC Final जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं? 'हा' मॅचविनर खेळाडू बाहेर!
| Updated on: Apr 04, 2023 | 6:53 PM
Share

मुंबई : टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जून महिन्यामध्ये 7 ते 11 यादरम्यान फायनल सामना होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघातील मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होता मात्र त्याच्यावर आता शस्त्रक्रिया होणार असल्याने तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्याला मुकणार आहे. इतकंच नाहीतर आयपीएलमधूनही हा खेळाडू बाहेर झाला आहे.

आयपीएलमध्ये केकेआर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा श्रेअस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 चा हंगाम आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये खेळू शकणार नाही. अय्यर शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाणार असून रिकव्हर व्हायला त्याला तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. आताच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याला मालिकेतून बाहेर पडाव लागलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये तो परतला होता खरा पण त्याला फारशी काही चमक दाखवता आली नव्हती. यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही वगळण्यात आलं होतं. भारत आणि बांगलादेश डिसेंबर 2022 दौऱ्यावेळी त्याला दुखापत झाली होती.

आयपीएलमध्ये केकेआर संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी असणाऱ्या अय्यरला आपल्या दुखपतीमुळे बाहेर जावं लागलं आहे. याआधीही त्याच्याकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचं कर्णधारपद असताना त्याला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं होतं. यंदाच्या सीझनमध्ये प्रत्येक संघाचे खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकल्याचं दिसत आहे.

दरम्यान, श्रेअसने 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करताना शतक झळकवलं होतं. त्यानंतर त्याने मधल्या फळीमध्ये फलंदाजीला येत संघासाठी खोऱ्याने धाव काढल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर अय्यरने आपलं कसोटी संघातील स्थान भक्कम केलं होतं. मात्र दुखापतीमुळे तो आयपीएल आणि WTC फायनल सामन्याला मुकणार आहे. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलमध्ये संघ कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.