AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित-यशस्वीची गळाभेट, हरुनही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीचं असेल समाधान

Rohit Sharma : यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू रोहित शर्माची गळाभेट घेतली. इतकच नाही, रोहित आणि यशस्वीमध्ये चर्चा देखील झाली. असं म्हणतात, फोटो सर्वकाही सांगून जातो. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या सीजनमधील हा पाचवा पराभव आहे. त्यांचा प्लेऑफचा मार्ग बिकट झाला आहे.

Rohit Sharma : रोहित-यशस्वीची गळाभेट, हरुनही रोहित शर्माला 'या' गोष्टीचं असेल समाधान
yashasvi jaiswal hug rohit sharmaImage Credit source: PTI
| Updated on: Apr 23, 2024 | 9:31 AM
Share

IPL 2024 मध्ये 22 एप्रिलची संध्याकाळ यशस्वी जैस्वालच्या नावावर. हा सामना त्याने गाजवला. त्याने शतक ठोकलं. विनिंग रन त्याच्या बॅटमधून निघाला. तो आपल्या टीमला विजयी करुनच डग आऊटमध्ये परतला. म्हणून यशस्वी जैस्वालच कौतुक कराव तेवढं कमी आहे. यशस्वी जैस्वालने 60 चेंडूंचा सामना करताना नाबाद 104 धावा फटकावल्या. IPL च्या इतिहासातील यशस्वी जैस्वालच हे दुसरं शतक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल शतकही यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्धच झळकावलं होतं.

IPL 2024 मध्ये पहिलं शतक झळकवल्यानंतर यशस्वी जैस्वाल बरच काही बोलला. त्यावेळी डोक्यामध्ये काय सुरु होतं? त्या बद्दलही यशस्वी व्यक्त झाला. शतकानंतर त्याने मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू रोहित शर्माची गळाभेट घेतली. यशस्वी जैस्वालने शतक ठोकून मॅच संपवली. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना रोहित शर्माची गळाभेट घेतली. इतकच नाही, रोहित आणि यशस्वीमध्ये चर्चा देखील झाली. असं म्हणतात, फोटो सर्वकाही सांगून जातो. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासोबतचा यशस्वी जैस्वालचा हा फोटोच सर्वकाही सांगून जातोय. पण याचा नेमका अर्थ काय? हे या दोन खेळाडूंनाच माहित असेल.

म्हणून रोहित शर्मा आनंदी असेल

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएल सीजनमधील हा पाचवा पराभव आहे. मुंबई इंडियन्सच्या या पराभवामुळे रोहित शर्माला निश्चित दु:ख झालं असेल. रोहितला बॅटने सुद्धा फार मोठ योगदान देता आलं नाही. (6) रन्सवर बोल्टने सॅमसनकरवी त्याला झेलबाद केले. टीम हरल्याची खंत रोहित शर्माच्या मनात नक्की असेल. पण टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून त्याला यशस्वी जैस्वालच्या शतकाचा आनंद देखील झाला असेल.

यशस्वी जैस्वालचा रोल महत्त्वाचा

कारण IPL 2024 संपल्यानंतर लगेच वेस्ट इंडिज-अमेरिकेत T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्या टीममध्ये यशस्वी जैस्वालचा रोल महत्त्वाचा असेल. टीममधला महत्त्वाचा खेळाडू फॉर्ममध्ये असल्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणून टीम इंडियाचा कॅप्टन या नात्याने यशस्वीच्या शतकाने रोहित शर्माला आनंद झाला असेल.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.