AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्णभेदाविरुद्ध इंग्लंड क्रिकेटची मोठी कारवाई, यॉर्कशायर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करु शकणार नाही, खेळाडू बॅन

इंग्लंडचा यॉर्कशायर क्रिकेट क्लब (Yorkshire Cricket Club) यापुढे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करू शकणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) क्लबकडून हे अधिकार काढून घेतले आहेत.

वर्णभेदाविरुद्ध इंग्लंड क्रिकेटची मोठी कारवाई, यॉर्कशायर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करु शकणार नाही, खेळाडू बॅन
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 1:19 PM
Share

लंडन : इंग्लंडचा यॉर्कशायर क्रिकेट क्लब (Yorkshire Cricket Club) यापुढे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करू शकणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) क्लबकडून हे अधिकार काढून घेतले आहेत. गुरुवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, इंग्लंड क्रिकेटने म्हटले आहे की, यॉर्कशायर क्लबने आपला माजी खेळाडू अझीम रफिकने (Azeem Rafiq) केलेल्या वर्णद्वेषाच्या आरोपांची योग्यरित्या चौकशी केली नाही, ज्यामुळे क्रिकेटच्या ‘जन्टलमन्स गेम’ या इमेजला धक्का लागला आहे. यॉर्कशायर क्लबवर बंदी घालण्याबरोबरच, ईसीबीने त्यांचा फलंदाज गॅरी बॅलेन्सला (Gary Ballance) इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यास अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. (Yorkshire suspended from hosting cricket matches as ECB weighs in on Rafiq case)

यॉर्कशायरचा फलंदाज गॅरी बॅलन्सने बुधवारी कबूल केले की त्याने त्याचा जुना सहकारी अझीम रफिकवर वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, “बोर्डाला गॅरी बॅलन्सच्या संदर्भात तात्काळ कारवाई करायची आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतर हा निर्णयही बदलू शकतो. खरं तर, पाकिस्तानी वंशाचा खेळाडू आणि इंग्लंडच्या अंडर-19 संघाचा माजी कर्णधार अझीम रफिकने गेल्या वर्षी सांगितले होते की, यॉर्कशायर क्रिकेट क्लबमध्ये त्याला चांगली वागणूक मिळत नाही, त्याला बाहेरच्या व्यक्तींसारखी वागणूक मिळाली.

लीड्समध्ये सामने होणार नाहीत

ECB ने यॉर्कशायरकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद काढून घेतले म्हणजे सध्या लीड्समधील हेडिंगले मैदानावर कोणतेही एकदिवसीय, T20 सामने किंवा कसोटी सामने खेळवले जाणार नाहीत. इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये जून 2022 मध्ये लीड्समध्ये सामना प्रस्तावित आहे. याशिवाय जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामने खेळवले जाणार होते. मात्र आता बंदीनंतर या सामन्यांचे ठिकाण बदलण्यात येणार आहे.

वर्णभेदाच्या वादाचा यॉर्कशायरच्या प्रायोजकत्वावरही परिणाम

वर्णभेदाच्या वादामुळे यॉर्कशायर क्रिकेट क्लबवर चौफेर टीका होत आहे. यामुळे त्यांच्या प्रायोजकत्व करारावरही परिणाम झाला आहे. त्यांचा टायटल स्पॉन्सर Emerald नेही माघार घेतली आहे. याशिवाय, यॉर्कशायर टी (Yorkshire Tea), टेटले (Tetley) आणि अगदी किट प्रायोजक नायके (NIKE) यांनीदेखील वर्णभेदाच्या वादामुळे क्लबशी संबंध तोडले आहेत. या सर्वांनी वर्णभेदाच्या वादामुळे सुरु असलेल्या ताज्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि क्लबसोबतचा करार संपुष्टात आणला आहे.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपनंतर 18 वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणार, ICC च्या 3 ट्रॉफी जिंकणाऱ्या चॅम्पियन्सची मोठी घोषणा

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

(Yorkshire suspended from hosting cricket matches as ECB weighs in on Rafiq case)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.