काय तो बगिचा, काय तो गॉगल, काय ते कपडे एकदम ओक्के, धनश्री चहलच कडक डान्स, VIDEO

टीम इंडियाचा स्टार लेगब्रेक गोलंदाज युजवेंद्र चहल सोबत त्याची बायको धनश्री वर्मा (Dhanshree verma) सुद्धा आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. चहलची बायको धनश्री प्रसिद्ध युट्यूबर आहे.

काय तो बगिचा, काय तो गॉगल, काय ते कपडे एकदम ओक्के, धनश्री चहलच कडक डान्स, VIDEO
dhanshree-verma
Image Credit source: instagram
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 29, 2022 | 5:18 PM

मुंबई: टीम इंडियाचा आयर्लंड दौरा (Team India Ireland Tour) संपला आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने दोन टी 20 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. दोन सामन्यांच्या या छोट्याशा दौऱ्याचा खेळाडूंनी पुरेपूर आनंद लुटला. फक्त त्यांनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा आयर्लंड दौऱ्यामध्ये मौजमजा केली. टीम इंडियाचा स्टार लेगब्रेक गोलंदाज युजवेंद्र चहल सोबत त्याची बायको धनश्री वर्मा (Dhanshree verma) सुद्धा आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. चहलची बायको धनश्री प्रसिद्ध युट्यूबर आहे. ती नेहमीच वेगवेगळे रील्स इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असते. तिने आयर्लंडच्या रस्त्यावर डान्स करतानाची एक रील बनवली आहे. ही रील तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. धनश्री वर्माने गोविंदाच्या ‘हिरो नंबर 1’ चित्रपटातील ‘सोना कितना सोना हैं’ या गाण्यावर डान्स केला आहे. आतापर्यंत 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. दोन दिवसापूर्वी धनश्री नवरा युजवेंद्र चहल आणि कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत डबलिनच्या रस्त्यावर फिरत होती. डबलिनमध्ये धमाल करत असल्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

धनश्री वर्मा डान्सर

धनश्री वर्मा एक प्रोफेशनल कोरियोग्राफर आणि डान्सरही आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. धनश्री वर्माने युजवेंद्र चहल सोबत मिळून अनेक रील्स बनवल्या आहेत. धनश्री वर्मा पेशाने डॉक्टर आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात Active असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे. धनश्री प्रमाणे नवरा युजवेंद्र चहलही सोशल मीडियावर तितकाच सक्रीय आहे. तो सुद्धा गमती-जमतीचे वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें