AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: टीम इंडियाचा खेळाडू पासपोर्ट आणि मोबाईल विसरला! पाहा व्हीडिओ

Team India: टीम इंडियाचा खेळाडू उत्साहात पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओत या खेळाडूने हा सर्व किस्सा सांगितला आहे. पाहा तो कोण आहे?

Team India: टीम इंडियाचा खेळाडू पासपोर्ट आणि मोबाईल विसरला! पाहा व्हीडिओ
yashasvi jaiswal and riyan parag rrImage Credit source: rr x account
| Updated on: Jul 03, 2024 | 4:05 PM
Share

टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतात येण्यासाठी उत्सूक आहे. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफ गुरुवारी 4 जुलै रोजी पहाटे नवी दिल्लीत पोहचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंची नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत डबल डेकर (ओपन डेक) बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया कधी मुंबईत येतेय, याची प्रतिक्षा आहे. तर दुसर्‍या बाजूला टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही झिंबाब्वेला पोहचली आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध टी 20 सीरिज खेळणार आहे. याआधी टीम इंडियाचा एक युवा खेळाडू हा आपला पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. याबाबतची माहिती त्या खेळाडूने दिली.

बीसीसीआयने टीम इंडियाच्या या युवा खेळाडूंचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हीडिओत रियान परागने याबाबतची माहिती दिली आहे. रियान परागची टीम इंडियात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रियान टीम इंडियासाठी खेळण्याच्या उत्साहात पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. रियानने व्हीडिओत काय म्हटलंय जाणून घेऊयात.

रियान पराग काय म्हणाला?

“लहानपणापासून प्रवास करण्याचं स्वप्न होतं. आम्ही मॅच तर खेळतच असतो, पण त्यासह टीमसह प्रवास करणं, इंडियाची जर्सीसह जाणं हे भारी असतं. मी इतका उत्सूक होतो की पोसपोर्ट आणि मोबाईल विसरलो होतो, मी विसरलो नाही फक्त पासपोर्ट आणि मोबाईल दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं. आता माझ्याकडे आहे”, असं रियानने म्हटलं.

उत्साहाच्या भरात गडबड

“टीममध्ये नवे चेहरे आहेत, पण माझ्यासाठी ते ओळखीचे आहेत. आम्ही एकत्र खेळलो आहोत. लहानपणापासून हे स्वप्न पाहत होतो, ते आज पूर्ण झालं, त्यामुळे आनंद जास्त आहे. जेव्हा पहिला सामना कोणत्याही ग्राउंडवर खेळेन, तो क्षण मला काय लक्षात राहिलं”, अशा शब्दात रियानने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.