CWG 2022: महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना इंग्लंडशी होणार

पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवला. आता महिला हॉकीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

CWG 2022: महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना इंग्लंडशी होणार
CWG 2022: महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना इंग्लंडशी होणार
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 06, 2022 | 8:50 AM

मुंबई – बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) महिला हॉकीच्या (Hocky) दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा शूटआऊटमध्ये 3-0 असा पराभव केला. पूर्ण वेळेनंतर 1-1 अशी बरोबरी होती. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटवर पोहोचला होता. दोन्ही संघांना शूटआउटमध्ये प्रत्येकी पाच प्रयत्न केले जातात. ऑस्ट्रेलियाने पहिले तीन गोल केले, तर भारतीय संघाच्या एकाही खेळाडूला गोल करता आला नाही. त्यामुळे भारतील महिला संघाचा मोठ्या फरकाने पराभव झाला. कुस्ती खेळाडूंनी काल चांगली कामगिरी केल्यानंतर हॉकीमध्ये देखील भारताचा महिला हॉकी संघ चांगली कामगिरी करेल अशी शक्यता होती. परंतु काल झालेल्या पराभवामुळे चाहत्यांची निराशा झाली.

अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना इंग्लंडशी होणार

पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवला. आता महिला हॉकीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघाच्या आशा अजून संपलेल्या नाहीत. टीम इंडिया आता रविवारी कांस्यपदकासाठी न्यूझीलंडशी भिडणार आहे. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघ शनिवारी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.

टाइमरमुळे ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी

खरे तर पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाची पहिली संधी हुकली, पण टाइमर सुरू न झाल्यामुळे त्यांना आणखी एक संधी त्यांना मिळाली, त्यावर ऑस्ट्रेलिया संघाकडून आणखी एक गोल केला गेला. नेहा, नवनीत कौर आणि लालरेमसियामी यांना शूटआऊटमध्ये भारताकडून गोल करता आला नाही. तर ऑस्ट्रेलियाकडून अॅम्ब्रोसिया मॅलोन, अॅमी लॉटन आणि कॅटलिन नोब्स यांनी गोल केले. कालचा खेळ अत्यंत रोमहर्षक झाला. कालच्या खेळात दोन्ही संघाकडून रंगत आली होती. परंतु भारतीय खेळाडून शेवटच्या वेळात गोल करता आला नाही. त्यामुळे भारतीय महिला संघाचा पराभव झाला.