निवृत्तीनंतर यू टर्न, अंबाती रायडू थेट कर्णधार म्हणून मैदानात उतरणार

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रायडूला अक्षत रेड्डीच्या जागेवर संघाची धुरा देण्यात आली आहे. तर बी. संदीपला उपकर्णधार नियुक्त करण्यात आलंय.

निवृत्तीनंतर यू टर्न, अंबाती रायडू थेट कर्णधार म्हणून मैदानात उतरणार

हैदराबाद : विश्वचषकात निवड न झाल्यानंतर नैराश्यातून निवृत्तीचा निर्णय घेणाऱ्या अंबाती रायडूचं (Ambati Rayudu Hyderabad Captain) पुन्हा मैदानात पुनरागमन होणार आहे. हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून तो मैदानात उतरणार आहे. आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी त्यांची हैदराबाद संघाचा कर्णधार (Ambati Rayudu Hyderabad Captain) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रायडूला अक्षत रेड्डीच्या जागेवर संघाची धुरा देण्यात आली आहे. तर बी. संदीपला उपकर्णधार नियुक्त करण्यात आलंय.

विजय हजारे ट्रॉफी या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. विश्वचषकात निवड न झाल्यामुळे रायडू नाराज झाला होता, पण व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मी त्याच्यात अजून क्रिकेट बाकी असल्याची जाणीव करुन दिली, अशी माहिती हैदराबादचे निवडकर्ते नियोल डेविड यांनी दिली.

हैदराबाद संघ

अंबाती रायडू (कर्णधार), बी. संदीप (उपकर्णधार), पी. अक्षत रेड्डी, तन्मय अग्रवाल, ठाकूर टिळक वर्मा, रोहित रायडू, सीव्ही मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, मोहम्मद सिराज, मिक्कल जायसवाल, जे. मल्लिकार्जुन (यष्टीरक्षक), कार्तिकेय काक, टी. रवी तेजा, अजय देव गौड

निवृत्तीचा निर्णय परत घेणारे क्रिकेटर

निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानाची ओढ लागलेला रायडू हा पहिलाच क्रिकेटर नाही. यामध्ये दिग्गज खेळाडूंच्या नावाचा समावेश होतो. शाहीद आफ्रिदी याचं ताजं उदाहरण आहे. त्याने 2006 मध्ये कसोटी क्रिकेटमधून विश्रांती घेत असल्याची घोषणा केली. पण 2010 मध्ये कर्णधार म्हणून तो परतला आणि पुन्हा एकदा निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय 2011 च्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघातच वाद होते. प्रशिक्षक वकार युनूस यांच्यासोबतच्या मतभेदानंतर त्याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, पण पुन्हा एकदा परत आला आणि 2015 चा विश्वचषकही खेळला.

ब्रेंडन टेलर

2015 च्या विश्वचषकानंतर झिम्बॉम्ब्वेचा क्रिकेटर ब्रेंडन टेलरने निवृत्ती जाहीर केली आणि नॉटिंघमशायरशी करार केला. पण पुन्हा तो 2017 मध्ये देशाकडून खेळण्यासाठी परतला.

स्टीव्ह टिकोलो

निवृत्तीनंतर वयाच्या 42 व्या वर्षी संघासाठी परतण्याचा विक्रम केनियाच्या स्टीव्ह टिकोलोच्या नावावर आहे. कारण, केनिया संघ सर्वात जास्त टिकोलोवर अवलंबून होता, ज्यामुळे त्याला परतण्यासाठी विनंती करण्यात आली. 23 जानेवारी 2014 रोजी नेदरलँडविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला.

केविन पीटरसन

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसननेही निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने 2011 मध्ये वन डेमधून निवृत्तीची घोषणा केली. पण काही महिन्यातच तो माघारी परतला.

कार्ल हूपर

वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर कार्ल हूपर यांनी 1999 च्या विश्वचषकाच्या तीन आठवडे अगोदर निवृत्तीची घोषणा केली. पण 2001 मध्ये पुन्हा पुनरागमन केलं आणि 2003 च्या विश्वचषकात संघाचं नेतृत्त्वही केलं.

इम्रान खान

क्रिकेटच्या इतिहासात निवृत्तीनंतर परत येऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा मान पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांना जातो. 1987 च्या विश्वचषकानंतर इम्रान खान यांनी निवृत्ती घेतली. पण त्यानंतर वयाच्या 39 व्या वर्षी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक यांच्या विनंतीमुळे इम्रान खानने पुन्हा एकदा 1992 च्या विश्वचषकात पुनरागमन केलं आणि संघाला विश्वचषक जिंकून दिला.

जावेद मियादाद

निवृत्ती घेऊन परत येण्याची परंपरा पाकिस्तानमध्ये नवी नाही. निवृत्तीच्या घोषणेनंतर जावेद मियादाद यांनी 1996 चा विश्वचषक खेळण्यासाठी पुन्हा पुनरागमन केलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *