AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खान ते अंबाती रायडू, निवृत्तीचा निर्णय परत घेतलेले क्रिकेटर

33 वर्षीय रायडूने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (एचसीए) पत्र लिहून आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलंय. विश्वचषकात निवड न झाल्यानंतर रायडूने अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

इम्रान खान ते अंबाती रायडू, निवृत्तीचा निर्णय परत घेतलेले क्रिकेटर
| Edited By: | Updated on: Aug 30, 2019 | 10:32 PM
Share

हैदराबाद : भावूक होऊन निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अंबाती रायडूला (Ambati Rayudu Retirement) आता पश्चात्ताप होतोय. त्याने (Ambati Rayudu Retirement) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा निर्धार केलाय. 33 वर्षीय रायडूने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (एचसीए) पत्र लिहून आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलंय. विश्वचषकात निवड न झाल्यानंतर रायडूने अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

निवृत्तीचा निर्णय परत घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे, अशा आशयाचं पत्र रायडूने एचसीएला लिहिलं. चेन्नई सुपरकिंग्ज, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नोएल डेविड यांचे मी आभारी आहे. यांनी मला कठीण काळात साथ दिली आणि मी अजून क्रिकेट खेळू शकतो याची जाणिव करुन दिली, असंही त्याने म्हटलंय.

निवृत्तीचा निर्णय परत घेणारे क्रिकेटर

निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानाची ओढ लागलेला रायडू हा पहिलाच क्रिकेटर नाही. यामध्ये दिग्गज खेळाडूंच्या नावाचा समावेश होतो. शाहीद आफ्रिदी याचं ताजं उदाहरण आहे. त्याने 2006 मध्ये कसोटी क्रिकेटमधून विश्रांती घेत असल्याची घोषणा केली. पण 2010 मध्ये कर्णधार म्हणून तो परतला आणि पुन्हा एकदा निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय 2011 च्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघातच वाद होते. प्रशिक्षक वकार युनूस यांच्यासोबतच्या मतभेदानंतर त्याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, पण पुन्हा एकदा परत आला आणि 2015 चा विश्वचषकही खेळला.

ब्रेंडन टेलर

2015 च्या विश्वचषकानंतर झिम्बॉम्ब्वेचा क्रिकेटर ब्रेंडन टेलरने निवृत्ती जाहीर केली आणि नॉटिंघमशायरशी करार केला. पण पुन्हा तो 2017 मध्ये देशाकडून खेळण्यासाठी परतला.

स्टीव्ह टिकोलो

निवृत्तीनंतर वयाच्या 42 व्या वर्षी संघासाठी परतण्याचा विक्रम केनियाच्या स्टीव्ह टिकोलोच्या नावावर आहे. कारण, केनिया संघ सर्वात जास्त टिकोलोवर अवलंबून होता, ज्यामुळे त्याला परतण्यासाठी विनंती करण्यात आली. 23 जानेवारी 2014 रोजी नेदरलँडविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला.

केविन पीटरसन

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसननेही निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने 2011 मध्ये वन डेमधून निवृत्तीची घोषणा केली. पण काही महिन्यातच तो माघारी परतला.

कार्ल हूपर

वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर कार्ल हूपर यांनी 1999 च्या विश्वचषकाच्या तीन आठवडे अगोदर निवृत्तीची घोषणा केली. पण 2001 मध्ये पुन्हा पुनरागमन केलं आणि 2003 च्या विश्वचषकात संघाचं नेतृत्त्वही केलं.

इम्रान खान

क्रिकेटच्या इतिहासात निवृत्तीनंतर परत येऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा मान पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांना जातो. 1987 च्या विश्वचषकानंतर इम्रान खान यांनी निवृत्ती घेतली. पण त्यानंतर वयाच्या 39 व्या वर्षी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक यांच्या विनंतीमुळे इम्रान खानने पुन्हा एकदा 1992 च्या विश्वचषकात पुनरागमन केलं आणि संघाला विश्वचषक जिंकून दिला.

जावेद मियादाद

निवृत्ती घेऊन परत येण्याची परंपरा पाकिस्तानमध्ये नवी नाही. निवृत्तीच्या घोषणेनंतर जावेद मियादाद यांनी 1996 चा विश्वचषक खेळण्यासाठी पुन्हा पुनरागमन केलं होतं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.