AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमपुढे ‘गंभीर’ समस्या, एका ट्विटमुळे दिल्ली पोलिसांच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

गौतम गंभीरने एक ट्विट करुन दिल्लीतील सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या त्याच एका ट्विटने तो दिल्ली पोलिसांच्या रडारवर आलाय. (Delhi Police inquiry Gautam Gambhir Over Fabiflue medicine Tweet)

गौतमपुढे 'गंभीर' समस्या, एका ट्विटमुळे दिल्ली पोलिसांच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?
भारतीय संघाला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या गौतम गंभीरचही नाव या यादीत आहे. गंभीरची बॅट जेव्हा जेव्हा चालते तेव्हा तेव्हा संघ विजयी होतो. कसोटीमध्येही गंभीरने शतक केल्यावर भारताचा विजय पक्का झाला आहे.
| Updated on: May 15, 2021 | 2:24 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या कठीण काळात दातृत्वाचे अनेक हात मदतीसाठी पुढे येतायत. मग माणसातलेच देवदूत असोत, सामाजिक संघटना असोत काही मोजके राजकारणी असोत. खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) एक ट्विट करुन दिल्लीतील सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या त्याच एका ट्विटने तो दिल्ली पोलिसांच्या रडारवर आलाय. त्याने केलेल्या ट्विटमुळे दिल्ली पोलिसांच्या सवाल-जवाबाला आता गौतम गंभीरला सामोरं जावं लागणार आहे. (Delhi Police inquiry Gautam Gambhir Over Fabiflue medicine Tweet)

एका ट्विटमुळे गौतमपुढे ‘गंभीर’ समस्या

25 एप्रिल रोजी, गंभीरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने आपल्या फाउंडेशनच्या वतीने फॅबीफ्लूच्या औषधांचे विनामूल्य वितरण करण्याची घोषणा केली. गंभीरने म्हटलं होतं की, “आपण सध्या सगळे जण एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत. मी दिल्लीच्या लोकांना फॅबीफ्लू औषध देत आहे, जे तुम्ही जीजीएफच्या कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4  दरम्यान जाऊ शकता. यासाठी आपल्याला आपलं आधार आणि डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दाखवावी लागेल. याशिवाय आम्ही ऑक्सिजन सिलिंडरही देत ​​आहोत.”

दिल्ली पोलिसांच्या रडारवर गौतम गंभीर का?

गंभीरने रुग्णांसाठी औषध मोफत देऊन चांगलं काम करण्याचा इरादा केला खरा पण त्याच्यासमोर अडचणी आता वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांना आता हे जाणून घ्यायचंय की फॅबीफ्ल्यू औषधं गंभीरकडे नेमकी आली कुठून?

गंभीरच्या मोफत औषध वाटपावरुन काही राजकीय नेत्यांनी त्याच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या पवन खेरा आणि आपच्या दुर्गेश पाठक यांनी गंभीरवर आरोप करताना ही औषधं गौतमकडे कुठून आली, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. ज्यानंतर आता दिल्ली पोलीस गंभीरची चौकशी करणार आहे.

गौतम गंभीर फाऊंडेशन दिल्लीतील लोकांसाठी मैदानात

कोरोनाकाळात गौतम गंभीर आणि त्याचं फाऊंडेशन दिल्लीतील लोकांसाठी मैदानात आहे. सर्वसामान्यांना विविध प्रकारे गौतम गंभीर फाऊंडेशन मदत करत आहे. पण आता स्वत: गौतमच गंभीर समस्येत आहे. येत्या काही दिवसांत त्याला दिल्ली पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.

(Delhi Police inquiry Gautam Gambhir Over Fabiflue medicine Tweet)

हे ही वाचा :

क्रिकेटपटूंना अतिआत्मविश्वास नडला अन् इथेच कोरोनाने डाव साधला, पाहा IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री कशी झाली…

कोहली बाबर आझमच्या ‘एक पाऊल पुढे’, पाकिस्तानच्या दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने

Video : दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन, जोफ्रा आर्चरचा डोकं फोडणारा बाऊन्सर, बॅट्समन थोडक्यात वाचला!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.