AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरु होण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमात हजेरी लावत आज मोठी घोषणा केलीय. त्यांच्या या घोषणेमुळे खेळाडूंना भविष्यात नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरु होण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
| Updated on: Jan 14, 2023 | 10:20 PM
Share

पुणे : पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari 2023) अंतिम सामन्याचा थरार रंगत आहे. या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: उपस्थिती लावली. देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात हजर राहून आधी दोन उपांत्य फेरी पाहिल्या. चार तगडे पैलवान दोन उपांत्य फेरीत आमनेसामने आले. त्यांच्यामध्ये झालेल्या दोन उपांत्य फेरीत अंतिम सामन्यासाठी दोन मल्लांनी बाजी मारली. या दोन्ही मल्लांना अंतिम सामन्यासाठी एक तासांचा कालावधी देण्यात आला. या दरम्यानच्या काळात कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.

“महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच मेडल मिळवणार. आपल्या राज्यात खेळाडूंना 2 वर्षांपासून मानधन मिळत नाहीय. जे 6 हजार मानधन मिळत होते ते आता 20 हजार करणार”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार मानधन आहे ते आता साडे सात हजार करु”, अशीदेखील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुरु केला.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस फक्त यावरच थांबले नाहीत. त्यांनी महाराष्ट्र केसरी विजेता स्पर्धकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली. महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

दरम्यान, पहिल्या उपांत्य फेरीत मॅट विभागाचा शिवराज राक्षे आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत माती विभागाचा महेंद्र गायकवाडने बाजी मारली. त्यामुळे आता या दोन्ही विजयी पैलवानांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.

महाराष्ट्र केसरीच्या दोन उपांत्या फेऱ्या देखील अतिशय थरारकच झाल्या. मॅट विभागातील शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात हा चुसशीचा सामना रंगला. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षे याने बाजी मारली.

दुसरी उपांत्या फेरी ही माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात झाली. ही लढत देखील तितकीच थरारक झाली. दोन्ही मल्ल ताकदवान आहेत. पण महेंद्र गायकवाडने अतिशय कुशलतेने 8-2 च्या फरकाने बाजी मारली.

पहिल्या उपांत्य फेरीत मॅट विभागाचा शिवराज राक्षे आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत माती विभागाचा महेंद्र गायकवाडने बाजी मारली. त्यामुळे आता या दोन्ही विजयी पैलवानांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात जो विजयी होईल तो महाराष्ट्राचा 65 वा महाराष्ट्र केसरी ठरणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.