Virat Kohli Ignore Gautam Gambhir : विजयानंतर विराट कोहली याने गंभीरला केलं इग्नोर ? ड्रेसिंग रूममध्ये जातानाच केली अशी कृती…

Virat Kohli Gautam Gambhir : टीम इंडियाचा माजी कर्णघार विराट कोहली आणि मुख्य कोच गौतम गंभीर या दोघांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहे. रांचीत टीम इंडियाने विजय मिळवला. ड्रेसिंग रुममध्ये जात असताना विराट कोहलीने गंभीरला पाहून जी कृती केली, त्यावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Virat Kohli Ignore Gautam Gambhir : विजयानंतर विराट कोहली याने गंभीरला केलं इग्नोर ? ड्रेसिंग रूममध्ये जातानाच केली अशी कृती...
विराट कोहली- गौतम गंभीर वाद ?
| Updated on: Dec 01, 2025 | 2:09 PM

भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये सीनिअर खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटमध्ये कथितरित्या वाद झाल्याचा बातम्या सतत समोर येतच आहेत. साऊथ आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिक गमावल्यावर काल झालेल्या पहिल्या वनडेमध्ये अखेर भारताने विजयाचं खातं उघडलं. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या शानदार खेळीचा त्यात मोलाचा वाटा होता. मात्र याच मॅचदरम्यान जे झालं त्याचा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. कोहलीचं तथाकथित ‘डेथस्टेअर ’ ते शतक पूर्ण केल्यानंतर त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनपर्यंत, सध्या सर्व चाहते सोशल मीडियावर या हावभावांमागील अर्थ शोधताना दिसत आहेत.

रांचीतील वनडे सामन्यादरम्यान असं बरेच काही घडले ज्याची चाहते सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. विराट कोहली आणि भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये कोहली त्याच्या फोनवर व्यस्त होता. एवढंच नव्हे तर मुख्य कोच आणि दिल्लीचा माजी साथी गौतम गंभीर याला विराटने पूर्णपणे इग्नोर केलं. सर्व खेळाडू जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये जात होते, तेव्हाच हे घडल्याचे दिसून आलं.

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरिष्ठ खेळाडू आणि टीम मॅनेजमेंट यांच्यातील संवादाच्या अभावामुळे बीसीसीआय चिंतेत आहे. आणि बुधवारी रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचपूर्वी ही समस्या सोडवण्यासाठी बैठक बोलावली जाई शकते. दैनिक जागरणमधील एका रिपोर्टनुसार, गंभीर आणि रोहित आणि कोहलीसह भारतीय एकदिवसीय संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये सर्व काही आलबेल नाही. गंभीरला सोशल मीडियावर ट्रोल केल्याबद्दलही बीसीसीआय नाराज आहे.

पहिल्या वनडेमध्ये भारताचा विजय

काल रांचीमध्ये कोहली आणि रोहितने फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कोहलीने 135 धावा केल्या, तसेच त्याने 52 वे शतककही पूर्ण केलं. तर रोहित शर्माने अर्धशतक झळकावलं , एवढंच नव्हे तर त्याने वनडे मध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याचाही रेकॉर्ड तोडला. रांचीतील स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 बाद 349 धावा केल्या आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला 332 धावांवर रोखत 17 धावांनी विजय मिळवला.