Virat Kohli : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार विराट कोहली ? थेट सुनावला निर्णय..
विराट कोहलीने यावर्षी मे महिन्यात अचानक कसोटी अर्थात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, त्याच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला, चाहते तर हैराणच झाले. विराटने निवृत्ती घ्यायला नको होती असं अनेक तज्ज्ञांचं आणि चाहत्यांचं मत होतं. आता विराटने या निर्णयावर पुन्हा भाष्य केलं आहे, काय म्हणाला तो ?

रांचीमधील मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीने शानदार खेळी करत खणखणीत शतक झळकावलं. त्याच्या 135 धावांच्या सुंदर खएळीमुळे चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. त्या शतकी खेळीचा टीम इंडियाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे. पहिली मॅच जिंकून भारताने या मालिकेत 1-0 अशी बढत घेतली आहे. या शतकाने विराटचे चाहते तर खूप खुश झाले. पणसामना संपल्यानंतर त्याने एक घोषणा केली ज्यामुळे त्याच चाहत्यांना काहीसे दुःख झाले.अनेक रिपोर्ट्स आणि अटकळींच्या मध्यातच विराटने हे स्पष्ट केलं की तो फक्त एकच फॉर्मॅट खेळणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार त्याने केला.
रविवार, 30 नोव्हेंबरला रांचीमध्ये भारत वि. दक्षिणाफ्रिका यांच्यात पहिला वनजे सामना झाला. या मॅचमध्ये खएळत विराटने महिन्याभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं. यावेळी त्याने धुवाधार खेली करत खणखणीत शतक झळकावलं. हे त्याच्या कारकिर्दीतलं 52 शतकं असून 135 धावांच्या शानदार खेीमुळे टीकाकारांची तोडं पुन्हा बंद केली. विराट कोहलीने फक्त 120 चेंडूत 125 धावा केल्या, त्यामध्ये त्याने 11 चौकार आणि 7 षटकार लगावले. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला, त्या विजयात विराटच्या या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसाठी कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन ?
योगायोगाने, वनडेमधील कोहलीच्या शतकाच्या काही तास आधी, एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, अलीकडेच निवृत्त झालेल्या दिग्गजांना त्यांचा निर्णय बदलण्यासाठी आणि काही काळासाठी कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी बीसीसीआय आवाहन करू शकते. क्रिकबझने असे वृत्त दिले की विराट कोहलीशी संपर्क साधण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत, पण परंतु एक माजी खेळाडू पुनरागमनाचा विचार करू शकतो, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे टीम इंडिया गळपटल्यावर कोहली किंवा रोहित (टेस्टमध्ये) पुनरागमन करू शकतात का ? याच मुद्यावर सोशल मीडियावर दिवसभर चर्चा होत राहिली.
कोहलीने स्पष्टचं सांगितलं
रांचीतीन वनडेमध्ये शानदार शतकी खेळीनंतर विराटला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तेव्हाच प्रेझेंटर हर्षा भोगले यांनी विराटला याबद्दल प्रश्नही विचाराला. “तू क्रिकेटच्या एकाच फॉरमॅटमध्ये खेळत आहेस. हे कायमचे असेच राहणार आहे का?” असं भोगले यांनी विचारलं. त्यावर विराटने अगदी स्पष्ट शब्दांत, थेट उत्तर दिलं. आपण फक्त वनजे क्रिकेटच खेळणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. “हे नेहमीच असंच राहणार आहे. मी फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळत आहे.” असं विराटने सांगितलं. त्याच्या या उत्तरावरून हे स्पष्ट झाल की विराटने टेस्मधून निवृत्तीचा जो निर्णय घेतला आहे, तो मागे घेण्याचा त्याचा विचारही नाही. तो फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसेल.त्याच्या या उत्तरामुळे चाहत्यांची मात्र चांगलीच निराशा झाली.
