AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : म्हणून सचिन तेंडुलकर डायपर घालून मैदानात उतरला होता, काय झालं होतं नेमकं?; फॅन्सनाही हा किस्सा माहीत नसेल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव माहीत नाही अशी व्यक्ती विरळाच. त्याची ख्याती सर्व जगात पसरली आहे. खेळासाठी त्याचं समर्पण सर्वांना माहीत आहे. त्याची खेळी, त्याची मेहनत याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. मात्र 2003 च्या वर्ल्डकपदरम्यान त्याच्यासोबत जे घडलं...

Sachin Tendulkar : म्हणून सचिन तेंडुलकर डायपर घालून मैदानात उतरला होता, काय झालं होतं नेमकं?; फॅन्सनाही हा किस्सा माहीत नसेल
सचिन तेंडुलकर Image Credit source: social media
| Updated on: Aug 23, 2025 | 3:08 PM
Share

क्रिकेटसाठी आपलं संपूर्ण आयुष्य देणारा, क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव माहीत नाही अशी व्यक्ती विरळाच. त्याची ख्याती सर्व जगात पसरली आहे. खेळासाठी त्याचं समर्पण सर्वांना माहीत आहे. वडिलांचं निधन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सचिन वर्ल्डकपची मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याचा हा किस्साही अनेकांना माहीत असेलच. पण याच सचिनचा आणखी एक असा किस्सा आहे, जो फारच कमी लोकांना माहीत आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ या आपल्या आत्मचरित्रात सचिनने एक धक्कादायक खुलासा केला होता. 2003 साली आयसीसी वर्ल्डकप दरम्यान जोहान्सबर्गमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये त्याने तब्बल 160 मिनिटं त्याच्या पँटमध्ये टिश्यू पेपर ठेवून फलंदाजी केली होती.

झाली बिकट अवस्था

वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूप आजारी पडला. त्याचे पोट प्रचंड खराब झालं होतं आणि त्याची प्रकृती इतकी बिकट होती की अशक्तपणामुळे त्याला धावणे कठीण झालं होतं. जास्त जोर लावल्यास त्याची पँट खराब होण्याचा धोका होता. सचिनला पोटाचा त्रास झाला होता, ज्यामुळे ड्रिंक्स ब्रेक मध्ये तो वारंवार ड्रेसिंग रूममध्ये जात होता.

तेंडुलकरने त्या घटनेसंदर्भात सांगितलं की, “मी माझ्या एनर्जी ड्रिंक्समध्ये एक चमचा मीठ घातलं, मी विचार केला की त्यामुळे मला बरं वाटेल पण मदत करेल पण त्यामुळे माझं पोट खराब झालं. मला इतका त्रास होत होता की मला माझ्ा अंडरवेअरमध्ये टिश्यू पेपर ठेवावे लागले, मग कुठे मी फलंदाजी करू शकलो. एका ब्रेकमध्ये मी ड्रेसिंग रूममध्ये परत गेलो, कारण मला मैदानात खूप अस्वस्थ वाटत होतं ” असं सचिनने नमूद केलं.

सचिनसोबत भारतीय संघात डावाची सुरुवात करणाऱ्या वीरेंद्र सेहवागनेही एका कार्यक्रमादरम्यान याबद्दल सांगितलं होतं. तेंडुलकरने वाईट परिस्थितीत संघासाठी महत्त्वाची खेळी केली. त्याने 120 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या आणि भारताच्या 183 धावांच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्या सामन्यात माजी गोलंदाज जवागल श्रीनाथला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याने शानदार गोलंदाजी केली आणि 9 षटकांत 35 धावा देत 4 बळी टिपले. त्या स्पर्धेत सचिनने 11 मॅचमध्ये 673 धावा केल्या.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.