विराट कोहलीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

विराट कोहलीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. विराट कोहलीनं मुंबईतील मतदार यादीत नाव नोंदवावं यासाठी अर्ज केला आहे.  मात्र अर्ज उशिरा केल्यामुळे विराट कोहलीचं नाव मुंबईतील मतदार यादीत नोंदवता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने विराट कोहलीला कळवलं आहे.

विराट कोहलीनं 9 एप्रिलला अर्ज केला होता. मात्र मतदार नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती 30 मार्च असल्यामुळे, विराटचं नाव मुंबईतील मतदार यादीत नोंदवण्यात आलं नाही.

विराट कोहली हा मूळचा दिल्लीचा आहे. त्यामुळे त्याचं नाव दिल्लीतच असण्याची शक्यता आहे. मात्र विराट कोहली बऱ्याच वर्षांपासून मुंबईत राहतो. शिवाय लग्नानंतर विराट-अनुष्काने मुंबईत घर घेतल्याची चर्चा होती.

या सर्व पार्श्वभूमीवर विराट कोहलीने आपलं नाव मुंबईतील मतदार यादीत नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र मुदतीनंतर हा अर्ज केल्याने, निवडणूक आयोगाने कोहलीची मागणी अमान्य केली आहे.

दरम्यान, मागील वर्षी उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी त्या मतदारसंघात विराट कोहलीचं नाव आल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता.

मुंबईत चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *