AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England Tour Sri Lanka | श्रीलंके विरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

England Tour Sri Lanka | श्रीलंके विरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
| Updated on: Dec 11, 2020 | 7:30 PM
Share

कोलंबो : नववर्षात म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये इंग्लंड क्रिकेट संघ श्रीलंका   (England Tour Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या श्रीलंका दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी 16 सदस्यीय इंग्लड संघाची घोषणा करण्यात आली आहे. खरंतर ही कसोटी मालिका मार्च 2020 मध्ये खेळण्यात येणार होती. मात्र कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) ही कसोटी मालिका स्थगित करण्यात आली. या कसोटी मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरला विश्रांती देण्यात आली आहे. England announce squad for Test series against Sri Lanka

इंग्लंडच्या संघात जॉनी बेयरस्टो आणि मोईन अली या अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. तसेच निवड समितीने 16 सदस्यीय खेळाडूंसह 7 राखीव खेळाडूंनाही या श्रीलंका दौऱ्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ श्रीलंकेसाठी 2 जानेवारी 2020 ला निघणार आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेत पोहचल्यानंतर हंबनटोटा येथे क्वारंटाईन येथे राहणार आहेत. या क्वारंटाईन कालावधी दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंना सराव करण्याची मुभा असणार आहे. 5 ते 9 जानेवारी दरम्यान महेंद्रा राजपक्षे स्टेडियमवर सराव सामना खेळला जाणार आहे. यानंत 14 जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना- 14 ते 18 जानेवारी , गाले स्टेडियम

दुसरा कसोटी सामना – 22 ते 26 जानेवारी, गाले स्टेडियम

इंग्लंडचा कसोटी संघ : जो रूट (कप्तान), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, जैक क्राउली, सैम करन, बेन फोक्स, डेन लॉरेंस, जैस लीच, डोम सिबली, ऑली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वुड

राखीव खेळाडू : जेम्स ब्रेसी, मेसन क्रेन, शकिब महमूद, क्रेग ऑवर्टन, मैथ्यू पर्किंसन, ऑली रॉबिनसन, अमर विरदी

दरम्यान इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्याआधी श्रीलंका क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात श्रीलंका एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

SA Vs Pak : दक्षिण आफ्रिका 14 वर्षानंतर जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, जाणून घ्या, कसं असेल शेड्यूल?

Sri Lanka tour of South Africa | श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, नव्या चेहऱ्यांना संधी

England announce squad for Test series against Sri Lanka

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.