राशिद खानच्या हेलिकॉप्टर शॉटवर सारा फिदा, म्हणते ‘असा शॉट मला पण शिकव!’

राशिद खानच्या हेलिकॉप्टर शॉटवर सारा फिदा, म्हणते 'असा शॉट मला पण शिकव!'
Rashid Khan helicopter Shot

राशिद खानच्या हेलिकॉप्टर शॉटची भुरळ इंग्लंडची माजी महिला विकेट फलंदाज कीपर सारा टेलरला (Sarah Taylor) पडलीय. | England Sarah Taylor

Akshay Adhav

|

Feb 22, 2021 | 1:17 PM

मुंबई : सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (Pakistan Super League 2021) सुरु आहे.  या स्पर्धेत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पेशावर झालमी विरुद्ध लाहोर कलंदर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात लाहोरच्या फिरकीपटू राशिद खानने गुडघ्यावर बसत धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट (Rashid Khan Helicopter Shot) मारला. या शॉटची भुरळ इंग्लंडची माजी महिला विकेट कीपर सारा टेलरला (Sarah Taylor) पडलीय. तिने ट्विट करत रशीदचं तोंडभरुन कौतुक केलंय. (England Sarah Taylor Appriciate Rashid Khan Helicopter Shot)

सारा म्हणते, ‘असा शॉट खेळायला मला पण शिकव…’

लाहोरकडून बॅटिंग करत असताना राशिद खानने गुडघ्यावर बसत मैदानाबाहेर हेलिकॉप्टर शॉट भिरकावला. त्याचा हा व्हिडीओ मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. मला पण असा शॉट खेळायला शिकव, अशा आशयाचं ट्विट साराने केलं आहे. तिचं हे ट्विट अनेकांनी लाईक केलंय.

राशिद खानचा हेलिकॉप्टर शॉट

सामन्याच्या दुसऱ्या डावातील 19 वी ओव्हर अमद बट टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर राशिदने गुडघ्यावर बसून जोरदार सिक्स खेचला. यासह लाहोरने 141 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 9 चेंडू राखून पार केलं. राशिद खानने 15 चेंडूत 3 चौकार आणि 1 उत्तुंग षटकारासह ताबडतोड नाबाद 27 धावा केल्या. तर मोहम्मद हाफिजनेही सर्वाधिक नाबाद 33 रन्सची खेळी केली. तसेच पेशावरकडून वाहब रियाझ आणि साकिब महमूदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

141 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या लाहोरची सावध सुरुवात राहिली. फखर झमान आणि सोहेल अख्तर या जोडीने 29 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर लाहोरने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे लाहोरची 109-6 अशी बिकट स्थिती झाली. मात्र यानंतर मोहम्मद हाफिज आणि राशिद खान या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद 37 धावांची नाबाद भागीदारी केली.

कोण आहे सारा टेलर?

31 वर्षीय सारा टेलर ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू आहे. इंग्लडच्या महिला संघात ती विकेट कीपर बॅट्समन होती. राईट हँड बॅट्समन म्हणून तिने इंग्लंडसाठी काही अविस्मरणीय इनिंग खेळल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात ती ओपनिंगला बॅटिंग करायची तर कसोटी क्रिकेटमध्ये ती मधल्या फळीत फळीत फलंदाजी करायची.

(England Sarah Taylor Appriciate Rashid Khan Helicopter Shot)

हे ही वाचा :

Video : गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट,हा भन्नाट षटकार पाहाच!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें